भरारी पथक तपासणार दप्तराचे ओझे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

पुणे - दप्तराचे ओझे कमी असावे, म्हणून केंद्र, राज्य सरकारने वेळोवेळी आदेश काढले; परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी मात्र होताना दिसत नाही. परिणामी, दप्तराच्या ओझ्याने विद्यार्थ्यांचे खांदे मात्र वाकू लागले आहेत.

मात्र, उशिरा का होईना शिक्षण विभागाला जाग आल्याचे दिसून येत आहे. आता भरारी पथकामार्फत डिसेंबर महिन्यात कोणत्याही शाळांमध्ये अचानकपणे भेटी दिल्या जाणार असून, दप्तराचे ओझे तपासले जाणार आहे.

शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराची वजनमर्यादा केंद्र सरकारने निश्‍चित केली आहे. यानिमित्ताने शहरातील काही शाळांमध्ये ‘सकाळ’ने प्रातिनिधिक स्वरूपात दप्तराच्या ओझ्याची पाहणी केली. यात जवळपास दोनशे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन तपासण्यात आले. त्या वेळी दप्तराचे वजन नियमवालीपेक्षा अधिक असल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भातील वृत्त ‘सकाळ’ने बुधवारी प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत शिक्षण विभागाकडून (पुणे) शाळांमध्ये भरारी पथकामार्फत अचानकपणे भेटी देऊन दप्तराचे ओझे तपासले जाणार आहे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत ही तपासणी केली जाईल, अशी माहिती शिक्षण उपसंचालिका मीनाक्षी राऊत यांनी दिली.

दप्तराचे ओझे तपासण्यासाठी भरारी पथकात दोन ते तीन शिक्षणाधिकाऱ्यांचा सहभाग असेल. हे अधिकारी डिसेंबर महिन्यात कोणत्याही शाळेत अचानकपणे भेटी देतील. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन तपासले जाईल. ही तपासणी केल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
- मीनाक्षी राऊत, शिक्षण उपसंचालिका

Web Title: School Book Weight Checking