पिंपरी : शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत 'स्कूल' बस जळून खाक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जानेवारी 2020

रावेत येथील एस.बी. पाटील स्कुलच्या पार्किंगमध्ये (एम एच 14 सी डब्ल्यू 3373) या क्रमांकाची स्कुल बस रात्रीपासून उभी होती. शनिवारी सकाळी शॉर्टसर्किटमुळे बसला अचानक आग लागली

पिंपरी : शॉर्टसर्किटमुळे स्कूल बसला आग लागल्याची घटना रावेत येथे शनिवारी (ता 11) सकाळी सातच्या सुमारास घडली. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले आहे. या घटनेत बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कोणतीही जीवितहाणी झालेली नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रावेत येथील एस.बी. पाटील स्कुलच्या पार्किंगमध्ये (एम एच 14 सी डब्ल्यू 3373) या क्रमांकाची स्कुल बस रात्रीपासून उभी होती. शनिवारी सकाळी शॉर्टसर्किटमुळे बसला अचानक आग लागली. या  घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या निगडी, प्राधिकरण उपकेंद्राचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेत बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

पोलिस भरतीसंदर्भात मोठा निर्णय; आता मैदानी चाचणीनंतर लगेच...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School bus caught fire due to short circuit in Ravet pimpri

टॅग्स