मावळात विद्यार्थ्यांअभावी बंद पडताहेत शाळा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

पिंपरी - इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे प्रस्थ, खासगी मराठी शाळांकडेही विद्यार्थ्यांचा ओढा व कमी विद्यार्थी संख्येच्या एक किलोमीटर अंतरावरील शाळांचे एकत्रीकरण करण्याचे सरकारचे धोरण, यामुळे जिल्हा परिषदेच्या मावळ तालुक्‍यातील शाळा बंद पडत आहेत. 

पिंपरी - इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे प्रस्थ, खासगी मराठी शाळांकडेही विद्यार्थ्यांचा ओढा व कमी विद्यार्थी संख्येच्या एक किलोमीटर अंतरावरील शाळांचे एकत्रीकरण करण्याचे सरकारचे धोरण, यामुळे जिल्हा परिषदेच्या मावळ तालुक्‍यातील शाळा बंद पडत आहेत. 

मावळ तालुक्‍यात जिल्हा परिषदेच्या २८३ प्राथमिक शाळा आहेत. त्यामधून सध्या २२ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र विद्यार्थ्यांअभावी कुसगाव, धायमाळवाडी शाळा बंद केल्या. त्याच कारणामुळे कडकराई, गारमाळ, गाऊडसे वस्ती येथील शाळाही बंद करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. तसेच तालुक्‍यात ६३ माध्यमिक शाळा असून, त्यातील काही पाचवी ते दहावीपर्यंत तर काही आठवी ते दहावीपर्यंत आहेत. त्यातील ९१ शाळा अनुदानित, पाच अंशतः अनुदानित व १७ कायम विनाअनुदानित आहेत. ६३ शाळांमध्ये ५३ शाळा मराठी, तर नऊ शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत. डोंगरवाडी शाळेत एकच विद्यार्थी होता. तो शाळा सोडून अन्य शाळेत दाखल झाला आहे. तेथील शिक्षक पुढील काही महिन्यात सेवानिवृत्त होणार आहेत. एक किलोमीटरच्या अंतरात दोन शाळा असतील आणि विद्यार्थी संख्या कमी असेल, तर त्या एकत्र करून एकच शाळा सुरू ठेवणे हा सरकारचा निर्णय आहे, अशी माहिती मावळ पंचायत समितीचे सभापती गुलाबराव म्हाळस्कर यांनी दिली.

गारमाळ वस्ती शाळेत सात व कडकराई शाळेत दहा विद्यार्थी आहेत. त्यांना अन्य साधने नाहीत. गाऊडसेवस्ती शाळेतील विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत दाखल केले जाणार आहे. डोंगरवाडी शाळेत एकच विद्यार्थी होता. तो शाळा सोडून गेलेला आहे.
- मंगला वाव्हळ, गटशिक्षणाधिकारी, मावळ

Web Title: school is closed due to lack of students in Maval