esakal | शाळा-महाविद्यालये सुरु होणार की राहणार बंद? आज निर्णय

बोलून बातमी शोधा

school}

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा-महाविद्यालये सुरू करण्याबाबत रविवारी (ता. २८) निर्णय घेण्यात येणार आहे

शाळा-महाविद्यालये सुरु होणार की राहणार बंद? आज निर्णय
sakal_logo
By
वृत्तसंस्था

पुणे- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा-महाविद्यालये सुरू करण्याबाबत रविवारी (ता. २८) निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी शाळा-महाविद्यालये आणखी १५ दिवस बंद ठेवण्याबाबत प्रशासन गांभीर्याने विचार करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

गेल्या काही दिवसांपासून शहर आणि जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने नुकताच घेतला होता. त्याची मुदत २८ फेब्रुवारीला संपत आहे. सध्या शाळा-महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. तथापि शाळा-महाविद्यालये प्रत्यक्षात सुरू करण्याबाबत नेमका काय निर्णय होणार, याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून आहे. 

भोरमध्ये शेतकऱ्यांच्या डोक्याला ताप; एजंटांचे फोन करतायत हैराण

कोरोनाच्या नवीन लाटेत संसर्ग वाढू नये, यासाठी उपाययोजना करण्यासाठी "आयसर' आणि "टीसीएस' या दोन संस्थांकडून अभ्यास सुरू आहे. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत प्रशासन गांभीर्याने विचार करीत आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जिल्हाधिकारी, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा केली. शाळा-महाविद्यालये आणखी १५ दिवस बंद ठेवावीत, अशी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. परंतु याबाबतचा निर्णय रविवारी जाहीर करण्यात येणार आहे. 

नाना पेेठेतील टोळक्याची दहशत! दुकानात घुसून तरुणावर कोयत्याने वार

जम्बो हॉस्पिटललाही मुदतवाढ शक्य 

जम्बो हॉस्पिटलला मुदतवाढ देण्याबाबत प्रशासनाने निर्णय घ्यावा, असे निर्देश पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिले आहेत. त्याबाबतही विभागीय आयुक्तांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. यापुढे जम्बो हॉस्पिटलला तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्याबाबत विचार सुरू आहे. याचाही निर्णय रविवारी घेण्यात येणार आहे. 
 
शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याच्या निर्णयाची मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत आहे. पुढील टप्प्यात काय निर्णय घ्यावा, याबाबत नियोजन करण्यात येत आहे. याबाबत रविवारी आदेश काढण्यात येतील, असं  पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणालेत.