शालेय साहित्य ऑनलाइन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

पुणे - छोटा भीमचे कव्हर असलेली नोटबुक... कार- बसच्या आकाराची कंपास पेटी... बॉर्बी डॉल असलेली वॉटर बॉटल अन्‌ कलरफुल आणि विविध संदेश असलेली स्कूल बॅग.... असं सारं काही आता घरबसल्या खरेदी करता येणार आहे. विविध संकेतस्थळांवर शालेय साहित्य खरेदीसाठी उपलब्ध झाले आहे. त्यावर खास २० ते ५० टक्‍क्‍यांची सवलत देण्यात आली आहे. वॉटर बॉटल, कंपास पेटी, कलर्स आणि टिफिन बॉक्‍स असलेला खास बॉक्‍सही खरेदी करता येईल.

दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी नव्या प्रकारचे कलरफुल साहित्य बाजारात उपलब्ध असते. यंदा विविध संकेतस्थळांवरही नावीन्यपूर्ण शालेय साहित्य खरेदीसाठी आहे. नोटबुकपासून कंपास पेटीपर्यंत... टिफिन बॉक्‍सपासून ते पेन्सिलपर्यंत असे शालेय साहित्यातील सर्वकाही संकेतस्थळावर पाहता येईल. यामुळे पालकांचा बाजारात जाऊन खरेदी करण्याचा वेळ वाचणार असून, घरबसल्या पाल्याला हवे तसे साहित्य खरेदी करून देता येणार आहे.

छोटा भीम, पोकेमॉन, स्पायडर मॅन, मिकी माउस, अँग्री बर्ड, बार्बी डॉल, डॉनल डक आणि बॅटमॅन अशा विविध कार्टून्स स्कूलबॅगसह विविध संदेश असलेल्या कलरफुल स्कूल बॅग संकेतस्थळावर पाहायला मिळतील. स्पोर्टस, कार्टून, नेचर आणि विज्ञान- तंत्रज्ञानाशी निगडित असलेल्या कव्हर नोटबुकसह विविध सकारात्मक संदेश देणाऱ्या नोटबुक्‍सही संकेतस्थळावर खरेदीसाठी उपलब्ध आहेत. कार, बस, ट्रक आणि कार्टून अशा आकारातील कंपासपेटीसह पाऊचही खरेदी करता येणार आहे.

टिफिन बॉक्‍सबरोबरच पेन्सिल आणि कलर्स अशा शालेय साहित्यामध्येही वैविध्यता दिसून येईल. विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊन प्रत्येक साहित्यामध्ये कार्टून्सवर तसेच, या वर्षी ‘कलरफुल’ थीमवर भर पाहायला मिळेल.

शाळा सुरू होण्याआधी बाजारात गर्दी असते, त्यामुळे साहित्य खरेदीसाठी अडचणी येतात. संकेतस्थळावर शालेय साहित्य सहज उपलब्ध होते. आम्ही दरवर्षी संकेतस्थळावरून मुलांसाठी शालेय साहित्याची खरेदी करतो. घरबसल्या आवडेल तशी खरेदी करता येते.
- ओंकार जाधव, पालक

Web Title: school equipment online