सांग सांग भोलानाथ, शाळा सुरू होईल का; चिमुकल्यांची विचारणा | School | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 school
सांग सांग भोलानाथ, शाळा सुरू होईल का; चिमुकल्यांची विचारणा

सांग सांग भोलानाथ, शाळा सुरू होईल का; चिमुकल्यांची विचारणा

sakal_logo
By
अशोक बालगुडे

उंड्री - मागिल आठवड्यापासून पावसाळी वातावरण पाहून सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का, असे भावगीत नाही, तर दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा सुरू होतील का, अशी विचारणा शाळकरी मुलांकडून केली जात आहे. दिवाळीच्या सुटीनंतर शाळा सुरू करण्याचे जाहीर केले होते. मात्र, अद्याप शाळा सुरू करण्याचा निर्णय न झाल्याने मुले-पालक संभ्रमात आहेत.

शाळा सुरू होण्याकडे पालक-शिक्षक आणि चिमुकल्यांचे लक्ष लागले आहे.

अशोक जाधव, धनंजय हांडे, रिबेका कांबळे, हरिष काशीकर म्हणाले की, कोरोना महामारीमुळे मागिल दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. शाळांमध्ये जाण्यासाठी सुरुवातीला चिमुकले तयार होत नाहीत. मात्र, शाळेची गोडी लागल्यानंतर घरी थांबायला तयार नसतात. कोरोनामुळे शाळांना सुटी दिल्यानतर मुले काही दिवस खूश झाली. मात्र, आता त्यांना शाळा हवीहवीशी वाटू लागली आहे. मोबाईलचे आकर्षणही कमी होऊ लागले आहे. नको मोबाईल नको सुटी आता शाळा सुरू झाली पाहिजे, असा सूर चिमुकल्यांसह पालकांकडून आळवला जात आहे.

शाळा या बालवाडीपासून मुलांचा सर्वांगीण विकास साधण्याचे एकमेव ठिकाण आहे. चिमुकल्यांना बडबड गीते, बाल गीतांमधून शिकविण्याची वेगळी धाटणी आहे. नाचत गाणे म्हणत चिमुकल्यांना अभ्यासाची गोडी कधी लागते हे समजतदेखील नाही. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने चिमुकल्यांवर वेगळेच दडपण दिसून येत असल्याचे पाहायला मिळत आहे. मध्या काळामध्ये झालेले शैक्षणिक नुकसान कसे भरून काढायचे असाही सवाल पालकांना पडला आहे.

हेही वाचा: इंग्रजी,फ्रेंच,संस्कृत भाषेवर प्रभुत्व गाजवणारी इरा रोहन भिलारे

ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे मुलांना मोबाईलचे आकर्षक वाढले, हे खरे आहे. मात्र, मोबाईलच्या स्क्रीनवर अक्षरे नाही, तर लाईट वाचली जाते, त्यामुळे अनेक मुलांना डोळ्याचा त्रास होऊ लागल्याचे बोलले जात आहे. त्याचा मोठा त्रास भविष्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या माध्यमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरीही प्राथमिक शाळा कधी सुरू होतील, याबाबत निर्णय झाला नाही. टास्क फोर्सने शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत मुलांचे लसीकरण होत नाही, तोपर्यंत शाळा उघडणार नाहीत असे चित्र दिसत आहे.

कोरोना महामारीनंतर आठवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, पहिली ते सातवीची शाळा कधी सुरू होणार याचीही पालक व विद्यार्थ्यांना उत्सुकता आहे. आमची शाळा कधी सुरू होणार अशी विचारणा फोन, मेसेज व प्रत्यक्ष भेटून विद्यार्थी करत आहेत अशी प्रतिक्रिया साधना विद्यालयातील सहशिक्षक अनिल वाव्हळ यांनी दिली.

घरी बसून विद्यार्थ्यांना मित्रांसोबत सहभोजनाचा आनंद घेता येत नाही. खेळता येत नाही. मौज- मस्तीही करता येत नाही. आम्हांला घरी राहायचं नाही शाळेत जायचे आहे, खेळायचे, बागडायचे आणि शिकायचे आहे. नको मोबाईल, नको टॅब, नकोच ऑनलाइन शिक्षण आम्हांला हवेत आमचे छान छान शिकवणारे शिक्षक. त्यासाठी सांग सांग परमेश्वरा कोरोना जाऊ दे आणि आमची शाळा नियमित सुरू होऊ दे, अशी विद्यार्थ्यांकडून परमेश्वराकडे आर्त विनवणी होऊ लागली आहे.

हेही वाचा: 'राज्याच्या तिजोरीवर शिक्षकांचे निर्णय अवलंबून'

नको मोबाईल, नको टॅब, नकोच ऑनलाइन शिक्षण आम्हांला हवेत आमचे छान छान शिकवणारे शिक्षक. ऑनलाइन अध्यापनापेक्षा प्रत्यक्ष शिक्षणच मुलांच्या जास्त पचनी पडते असे उंड्रीतील रिबेका कांबळे यांनी सांगितले.

पहिली ते सातवीचे वर्ग कधी सुरू होणार याचीही पालक व विद्यार्थ्यांना उत्सुकता आहे. आमची शाळा कधी सुरू होणार अशी विचारणा फोन, मेसेज व प्रत्यक्ष भेटून विद्यार्थी करत आहेत, असे अनिल वाव्हळ यांनी स्पष्ट केले.

शिक्षणाने माणूस घडतो, सुसंस्कृत आणि शहाणा होतो. परंतु गेल्या दीड वर्षांपासून फक्त ऑनलाईन शिक्षणच सुरू आहे. छोटा गट-मोठा गट या वयोगटातील मुले अतिशय लहान असतात. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे त्यामुळे शासनाने शाळा सुरू करण्याची परवानगी द्यावी, विस्तारा वर्ल्ड स्कूलच्या संस्थापिका कांचन नाझरे यांनी सांगितले.

महानगरपालिका शाळेतील शिक्षिका मंजूश्री शिंदे म्हणाल्या की, शाळा विद्यार्थी घडविण्याचे केंद्र आहे. विश्व उद्याचे इथेच किलबिलते. उद्याचा भारत शाळेच्या वर्गातच घडत असतो. आम्ही शिक्षक व विद्यार्थी कोरोनो सर्व नियमांचे पालन करू, परंतु नको ते ऑनलाईन अध्ययन व अध्यापन अशी पालकांची मनोमन इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

loading image
go to top