पुण्यात उद्यापासून शाळा सुरु पण, काही वर्ग बंद

ज्ञानेश सावंत
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

पाऊस ओसरल्याने शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये बुधवारपासून (ता.7) सुरू होणार आहेत. मात्र, महापालिकेच्या 16 शाळांत पूरग्रस्तांची सोय केल्याने त्या शाळांतील काही वर्ग बंद राहणार आहेत. पूरस्थिती पूर्णपणे ओसल्यानंतरच या शाळांतील वर्ग सुरू होतील, असे महापालिकेच्या शिक्षण विभागाने कळविले आहे. 

पुणे : पाऊस ओसरल्याने शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये बुधवारपासून (ता.7) सुरू होणार आहेत. मात्र, महापालिकेच्या 16 शाळांत पूरग्रस्तांची सोय केल्याने त्या शाळांतील काही वर्ग बंद राहणार आहेत. पूरस्थिती पूर्णपणे ओसल्यानंतरच या शाळांतील वर्ग सुरू होतील, असे महापालिकेच्या शिक्षण विभागाने कळविले आहे. 

शहरात गेल्या काही दिवसांत जोरदार पाऊस झाल्याने खडकवासला धरणातून मोठ्या प्र्रमाणात पाणी सोडण्यात आले. परिणामी, काही भागांतील घरांत पाणी शिरले, तर, काही रस्ते आणि पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे गेली दोन म्हणजे, सोमवार आणि मंगळवारी सर्व, शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, मंगळवार सकाळपासून पाऊस कमी झाला. त्यामुळे धरणातील विसर्गही कमी करण्यात आला. त्यामुळे सर्व शाळा, महाविद्यालये सुरू होती. परंतु, महापालिकेच्या विविध भागांत 16 शाळांत सुमारे पाच हजार लोकांच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे.

पूरस्थिती ओसरेपर्यंत या लोकांची शाळेत व्यवस्था केली आहे. त्यामुळे तेथील वर्ग भरविणे शक्‍य होणार नाही. त्यामुळे लोकांना घरी पाठविल्यानंतरच वर्ग भरविण्याची सूचना शिक्षण विभागाने केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School started in Pune from tomorrow but some classes closed