School Students : शालेय विद्यार्थ्यांना गृहपाठ हवाच; शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे

‘शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्याऐवजी शाळेतच अभ्यास करून घ्यावा,’ असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी नुकतेच एका कार्यक्रमात केले.
School Students
School Studentssakal

पुणे - ‘शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्याऐवजी शाळेतच अभ्यास करून घ्यावा,’ असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी नुकतेच एका कार्यक्रमात केले. राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या भुवया उंचावल्या आहेत. शालेय शिक्षणातील गृहपाठाचे महत्त्व अधोरेखित करत सरसकट ‘विद्यार्थ्यांना गृहपाठ नको,’ असा निर्णय घेण्यात येऊ नये, असे शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक सुचवत आहेत.

लहान मुलांच्या शाळांच्या वेळा बदलण्याचा सल्ला काही दिवसांपूर्वी राज्यपाल रमेश बैस यांनी राज्य सरकारला दिला होता. त्यानंतर राज्य सरकारने चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ किंवा त्यानंतर भरविण्यात याव्यात असा आदेश काढला. त्यामुळेच आता विद्यार्थ्यांच्या गृहपाठाबाबत शिक्षणक्षेत्रात चर्चा होऊ लागली आहे.

स्वयंअध्ययन होणार का?

‘विद्यार्थ्यांना शाळेत शिकविल्यानंतर त्या अभ्यासाचा सराव, स्वयं अध्ययन करण्यासाठी गृहपाठ दिला जातो. अभ्यासाचा सराव आणि स्वयंअध्ययन महत्त्वाचे आहे. खरंतर शाळेत शिकविलेले विद्यार्थ्यांना किती समजले आहे, त्यांना सरावाची गरज आहे का?, हे शिक्षकांना कळते. गृहपाठ द्यावा की नाही, हे शिक्षकांना अधिक चांगले समजेल.

त्यामुळे सरसकट गृहपाठ नको, हे निश्चित न करता तो निर्णय शिक्षकांवर सोपवावा. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासाचा सराव किंवा स्वयं अध्ययन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे का?,’ असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक धनवंती हर्डीकर यांनी उपस्थित केला आहे.

गृहपाठ नसल्यास...

  • अभ्यासक्रमातील संकल्पना स्पष्ट होणार नाहीत

  • शिकविलेला अभ्यास सरावाअभावी विसरला जाऊ शकेल

  • गुणवत्तेवर परिणाम होईल

  • अभ्यासक्रमातील ‘इंटरलिंक’ समजून घेण्यात अडचण येईल

  • अभ्यासातील मूलभूत संकल्पना पक्क्या होणार नाहीत

गृहपाठ का असावा?

  • अभ्यासक्रमातील संकल्पना अधिक पक्क्या होतात

  • विषय समृद्धी होते

  • अभ्यासाची उजळणी, सराव होतो

  • पूनर्वाचन, पूर्ववाचन होते

  • स्वयं अध्ययनातून घडते

स्वयंअध्ययनाची पर्यायी व्यवस्था काय?

सेवानिवृत्त मुख्याध्यापिका नेहा पेंढारकर म्हणाले, ‘‘शाळेत शिकविलेला अभ्यास, त्यातील संकल्पना अधिक स्पष्ट होण्यासाठी गृहपाठ महत्त्वाचा असतो. अर्थात घरात पालकांच्या मदतीने, देखरेखीखाली गृहपाठ करणे अपेक्षित आहे. शाळेतील गृहपाठ बंद करण्याचा सरसकट निर्णय सरकारने घेऊ नये.

आणि असा निर्णय घ्यायचा असल्यास, विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील सर्व संकल्पना समजल्या आहेत, याची जबाबदारी शिक्षकांवर द्यावी. गृहपाठ नसेल, तर अभ्यासातील संकल्पना अधिकाधिक स्पष्ट होण्यास आणि सरावास पर्यायी व्यवस्था काय असेल, याची स्पष्टता होणे आवश्यक आहे.’

... पण ताण येईल इतका ‘अति’ नको

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेच्या मुख्याध्यापिका पूजा जोग म्हणाल्या, ‘विद्यार्थ्यांना शाळेत शिकविलेल्या धड्यांच्या, विषयांमधील संकल्पना अधिक पक्क्या होण्यासाठी गृहपाठ असायलाच हवा.

गृहपाठामुळे अभ्यासाची उजळणी, पुनर्वाचन, पूर्ववाचन आणि सराव होईल. त्यातून विद्यार्थ्यांची संकल्पना पक्क्या होतील आणि विषय समृद्धी होईल. विद्यार्थ्यांना ताण, दडपण येईल इतका ‘अति’ गृहपाठ नसावा, हे मान्य. परंतु शिक्षणात गृहपाठाचे महत्त्व आहे. त्यातून स्वयंअध्ययन होते व शिक्षण प्रक्रियेत आवश्यक असणारा पालकांचा सहभागही वाढतो.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com