शिक्षिकेची विद्यार्थ्यांला अमानुष मारहाण 

संदीप घिसे 
रविवार, 18 मार्च 2018

एका शिक्षिकेने विद्यार्थ्यांचे डोके बेंचवर आपटून अमानुष मारहाण केली. ही घटना भोसरी येथील स्वामी समर्थ इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये घडली आहे. 

पिंपरी (पुणे) - स्पेलिंग लिहिताना चूक केल्याने एका शिक्षिकेने विद्यार्थ्यांचे डोके बेंचवर आपटून अमानुष मारहाण केली. ही घटना भोसरी येथील स्वामी समर्थ इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये गुरुवारी (ता. 15) घडली.

रवींद्र कौतिक चव्हाण (वय 33 रा. धावडे वस्ती, भोसरी) यांनी याबाबत भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद आहे. ईशा टीचर (पूर्ण नाव माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी टीचरचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चव्हाण यांचा सहा वर्षीय मुलगा सुमित हा इंद्रायणीनगर भोसरी येथील स्वामी समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकत आहे. गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास क्लास वर्क बुकमध्ये स्पेलिंग लिहिताना चूक केल्याने सुमित यास छडीने पाठीवर अमानुष मारहाण केली. तसेच त्यांचे डोके बेंचवर आपटून त्यास गंभीर जखमी केले. याबाबत टीचरच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास भोसरी पोलिस करीत आहेत

Web Title: School teacher assaulted a student