पुणे : जिल्ह्यात एक फेब्रुवारीपासून शाळा सुरू होणार

पहिली ते आठवीचे वर्ग अर्धवेळ तर, नववी ते बारावीचे वर्ग पूर्णवेळ ; महापालिका क्षेत्रातील शाळांमधून फिरत्या पथकाद्वारे लसीकरण
School Start
School Startsakal

पुणे : जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोना संसर्गाचे (corona)प्रमाण कमी झाल्यामुळे मार्गदर्शक सूचनांचे पालन करून एक फेब्रुवारीपासून शाळा सुरू करण्यात याव्यात. तसेच, महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये फिरत्या पथकाद्वारे लसीकरणाची(vaccination) सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार(ajit pawar) यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात शनिवारी (ता. २९) आयोजित जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठकीत ते बोलत होते. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख या वेळी उपस्थित होते.

School Start
Video: मग महिला ही प्यायला तरी चालतील, रावसाहेब दानवे यांचे वक्तव्य

पवार म्हणाले, पहिली ते आठवीचे वर्ग अर्धवेळ सुरू करण्यात यावेत. तर, नववी ते बारावीचे वर्ग पूर्णवेळ सुरू करावेत. पुढील आठवड्यात कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन सर्व शाळा पूर्णवेळ सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबतचा निर्णय पालकांनी घ्यावा, त्याबाबत तूर्तास सक्ती करू नये. एक फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू होत असल्यामुळे लसीच्या दोन मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा. लसीकरण झाले नसल्यास विद्यार्थ्यांना लसीकरणाबाबत सूचना देण्यात याव्यात.

लसीकरणामुळे मृत्यूच्या प्रमाणात घट होत असून, लसीकरणावर विशेष भर द्यावा. ग्रामीण भागातील शाळांमधून लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचे प्रमाण चांगले आहे. परंतु शहरी भागात ते कमी आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील शाळांमधून फिरत्या लसीकरण केंद्राद्वारे लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. लसीकरण वाहनासोबत वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. संस्थाचालकांनी शाळेत कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन आणि विद्यार्थ्यांचे पूर्ण लसीकरण होईल याची दक्षता घ्यावी.

School Start
हिंगोलीत शेतकऱ्यांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या रावसाहेब दानवे यांच्या विरोधात  आंदोलन व निदर्शने

प्रारंभी गृहमंत्री वळसे पाटील यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा लवकर सुरू करण्याची सूचना केली. तसेच, डॉ. गोऱ्हे यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, पहिली ते आठवीचे वर्ग अर्धवेळ सुरू करण्यात यावे. शाळेतही विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना केली.

बैठकीस आमदार अशोक पवार, दिलीप मोहिते, सुनील टिंगरे, चेतन तुपे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, राजेश पाटील, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, कृष्ण प्रकाश, विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.

School Start
भाजपचे मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांना पुण्यात अटक

मास्क अनिवार्यच

मास्क न वापरण्याविषयी मंत्रिमंडळ बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही. कोरोनाचे संकट अद्याप कायम असून, नागरिकांनी मास्क वापरण्यासोबतच मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. नागरिकांनी संसर्गापासून बचाव करण्यासाठी चांगला मास्क वापरावा. मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कारवाई सुरूच ठेवावी, अशा सूचना पवार यांनी दिल्या..

School Start
भाजपचे मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांना पुण्यात अटक

विनामास्क नागरिकांना ७६ लाखांचा दंड

जिल्ह्यात मागील आठवड्यात ९० हजार १३७ नवीन रुग्ण(corona patients) आढळले आहेत. जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांनी लसीची पहिली मात्रा तर, ८५ टक्के लाभार्थ्यांनी दुसरी मात्रा घेतली आहे. ६० वर्षांवरील सहव्याधी असलेल्या २३ टक्के नागरिकांनी लसीची वर्धक मात्रा (booster dose) घेतली आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करून ७५ लाख ९२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त राव(sourav rao) यांनी दिली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com