पुण्यात शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंदच

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 November 2020

पुणे महापालिकेने सोमवारपासून (ता. २३) शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या, पण मुलांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांनी दिलेला ठाम नकार, संस्थाचालक, शिक्षक यांचा विरोध लक्षात घेता, महापालिकेला हा निर्णय बदलावा लागला आहे. पुणे शहरातील सर्व शाळा १३ डिसेंबरपर्यंत उघडणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे - पुणे महापालिकेने सोमवारपासून (ता. २३) शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या, पण मुलांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांनी दिलेला ठाम नकार, संस्थाचालक, शिक्षक यांचा विरोध लक्षात घेता, महापालिकेला हा निर्णय बदलावा लागला आहे. पुणे शहरातील सर्व शाळा १३ डिसेंबरपर्यंत उघडणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनामुळे शाळा अद्याप उघडलेल्या नाहीत. राज्य सरकारने २३ नोव्हेंबरपासून राज्यातील नववी ते बारावीपर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण अद्याप कोरोनाचा धोका टळलेला नसताना विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांनी विरोध दर्शविला होता. तरीही राज्य सरकारने हा निर्णय बदलला नाही. त्यानंतर स्थानिक प्रशासनावर याबाबत निर्णय घेण्याचे सोपविण्यात आले होते. राज्यात मुंबई, ठाणे सह इतर ठिकाणी आताच शाळा सुरू केल्या जाणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले होते. पण पुणे महापालिकेने २३ नोव्हेंबरपासून सर्व नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्याबाबत आदेश काढले होते. मात्र, हा निर्णय २४ तासाच्या आत माघारी घेण्याची वेळ महापालिकेवर आली.

बर्निंग कारचे गूढ; कशी पेटली, वाहनात किती प्रवासी होते, माहिती उपलब्ध नाही 

शनिवारी (ता. २१) पुणे महापालिकेत महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत महापालिका प्रशासनाने चर्चा केली. पुण्यातील अनेक शाळांमध्ये निर्जंतुकीकरण, सुरक्षेच्या उपाय योजना, शिक्षकांची कोरोना चाचणी यासह इतर अनेक कामे अपूर्ण आहेत. गेल्या दोन- तीन दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने व अद्याप लस आलेली नसल्याने अनेक पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यास विरोध केलेला आहे. हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन, १३ डिसेंबरपर्यंत पुण्यातील शाळा सुरू करू नयेत असा निर्णय पक्षनेते व पदाधिकाऱ्यांच्या चर्चेतून झाला. महापौर मोहोळ यांनी १३ डिसेंबरपर्यंत शाळा बंद राहतील, असा निर्णय जाहीर केला. 

Bharat ke Mahaveer: पुण्याचा रिक्षावाला दिसणार 'डिस्कव्हरी'वर; लॉकडाउनमध्ये स्थलांतरितांना केली होती मदत!

पुणे शहरातील अनेक शाळांची तयारी पूर्ण झालेली नाही. त्यांना आणखी मुदतवाढ आवश्‍यक आहे. त्यामुळे पुणे महापालिकेचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यात १३ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पालकमंत्री अजित पवार यांच्याशीही याबाबत चर्चा करण्यात आली आहे.
- रुबल अगरवाल, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

Success Story: केळीनेच मारले अन् तारलेही; इराणला निर्यात होतेय लासुर्णेच्या शेतकऱ्याची केळी!​

शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठविण्यास पालकांचा प्रचंड विरोध आहे. शिक्षकदेखील त्यांचा जीव धोक्‍यात घालून काम करणार आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाची सवय झालेली असताना व रुग्ण संख्या वाढत असताना मुलांना शाळेत पाठविण्यास पालक तयार नाहीत. त्यामुळे आत्ताच शाळा सुरू करणे योग्य नाही.
- संजय खटावकर, शिक्षक

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Schools closed in Pune till December thirteen