
पुणे : पावणे दोन वर्षात पहिल्यांदाच उच्चांकी कोरोना रुग्णांची नोंद
पुणे : पुणे जिल्ह्यात गुरुवारी (ता.२०) दिवसभरात १४ हजार ४२४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. मागील सुमारे पावणे दोन वर्षात गुरूवारी पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यातील दिवसातील नवीन उच्चांकी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. याऊलट ८ हजार ६६५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. अन्य अकरा जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (Pune District Corona Patient Update)
जिल्ह्यातील दिवसांतील एकून नवीन रुग्णांपैकी निम्म्याहून अधिक रुग्ण हे पुणे शहरातील आहेत. शहरात दिवसात ७ हजार २६४ नवे रुग्ण सापडले आहेत. शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमध्ये ४ हजार ९४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात २ हजार १०४, नगरपालिका हद्दीत ७०५ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात २५७ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
हेही वाचा: पुणे : दुर्धर आजाराने ग्रासलेल्या बालकांची तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी
दिवसातील एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील ४ हजार ५७५, पिंपरी चिंचवडमधील २ हजार २७१, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १ हजार २४४, नगरपालिका हद्दीतील २६९ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ३०६ जण आहेत. दिवसातील एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील सात, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील दोन आणि पिंपरी चिंचवड व नगरपालिका हद्दीतील प्रत्येकी एक मृत्यू आहे.
सध्या पुणे जिल्ह्यात एकूण ७८ हजार ८४६ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. एकूण सक्रिय रुग्णांपैकी पुणे शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये मिळून २ हजार ६९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उर्वरित ७६ हजार १५० रुग्ण गृह विलगीकरणात आहेत.
Web Title: Pune District Corona Patient Update
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..