
डिसेंबर महिन्यात 13 तारखेपासून शाळा सुरू करण्याचा प्रशासनाने प्रयत्न केला. पण 10 टक्केपेक्षा कमी पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्याबाबत संमतिपत्र दिले. त्यामुळे महापालिकेला पुन्हा एकदा माघार घ्यावी लागली होती.
पुणे : कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या नऊ महिन्यांपासून पुण्यातील शाळांना टाळे लागलेले आहे, पण अखेर शाळा सोमवारपासून (ता.4) उघडणार असून, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने नियमांचे पालन करत शाळा पुन्हा गजबजणार आहेत. पूर्वीच्या निर्णयात कोणताही बदल केला नाही, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले.
राज्यभरातील इयत्ता 9वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. पुणे शहरातील शाळा कोरोनाच्या उद्रेकामुळे आणि पालकांच्या विरोधामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. डिसेंबर महिन्यात 13 तारखेपासून शाळा सुरू करण्याचा प्रशासनाने प्रयत्न केला. पण 10 टक्केपेक्षा कमी पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्याबाबत संमतिपत्र दिले. त्यामुळे महापालिकेला पुन्हा एकदा माघार घ्यावी लागली होती.
- 'ओ साहेब, बोला किती पैसे पाहिजेत तुम्हाला'; तरुणानं पोलिस उपनिरीक्षकाशी घातली हुज्जत
महापालिका आयुक्त कुमार यांनी काही दिवसांपूर्वी 4 जानेवारी रोजी शाळा सुरू करण्याबाबत आदेश काढले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरातील कोरोनाची साथ नियंत्रणात असल्याने रुग्णसंख्या कमी झाली आहे. तसेच शाळांमधील शिक्षकांना आता तिसऱ्या वेळेस कोरोनाची चाचणी करून घ्यावी लागली आहे. त्यामुळे यंत्रणेवर देखील ताण निर्माण होत आहे. त्यामुळे पूर्ण काळजी घेऊन शाळा सुरू करण्याबाबत महापालिकेची तयारी झाली आहे.
- नेहा कक्करला करायचंय दुसऱ्यांदा लग्न; वाचा काय आहे कारण
दरम्यान, महापालिका आयुक्त कुमार यांनी पुणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील शाळा सुरू करण्याबाबतचा आढावा घेऊन तारीख शनिवारी जाहीर केली जाईल असे सांगितले होते. त्याबाबत त्यांना विचारले असता, ते म्हणाले, "शाळा सुरू करण्याबाबत आम्ही जो निर्णय घेतला आहे, त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही.''
शाळा समंतिपत्रांचे प्रमाण वाढेल
पुणे महापालिकेच्या 44 शाळांमधील 8 हजार 759 विद्यार्थ्यांपैकी 2 हजार 835 विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमतिपत्र दिले आहेत. शनिवारी यामध्ये वाढ झालेली नाही, पण शाळा सुरू झाल्यानंतर संमतिपत्र देण्याचे प्रमाण वाढेल असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)