esakal | नेहा कक्करला करायचंय दुसऱ्यांदा लग्न; वाचा काय आहे कारण
sakal

बोलून बातमी शोधा

Neha_Kakkar

इंडियन आयडॉलच्या कार्यक्रमात नेहाने आपल्याला पुन्हा एकदा वेगळ्या पध्दतीने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

नेहा कक्करला करायचंय दुसऱ्यांदा लग्न; वाचा काय आहे कारण

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर हिने मागील महिन्यात रोहनप्रीत सोबत लग्न केले. त्याचा मोठा गाजावाजा सोशल मीडियावर झाला होता. त्याचे फोटो तिनं इंस्टावरून व्हायरल केले होते. त्यालाही नेहा आणि रोहनच्या चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. मात्र त्या लग्नावर नेहा फार खूश नसल्याचे दिसून आले आहे. त्यासाठी तिनं वेगळी कल्पना लढविली आहे. 

'अगोदर बोलल्या, मग मागितली माफी: अभिनेत्री निशिगंधा वाड यांची दिलगिरी'

2020 मध्ये मोठ्या धुमधडाक्यात नेहाचं लग्न झालं होतं. त्यावेळचा सगळ्यात मोठा इव्हेंट म्हणून या लग्न सोहळ्याकडे पाहिले गेले होते. रीतसर पंजाबी पद्धतीने लग्न करणाऱ्या नेहाला आता ख्रिश्चन पद्धतीने लग्न करायचे आहे. त्यासाठी तिनं सुरुवातही केली आहे. तिचा पती इंडियन आयडॉलमध्ये एक गेस्ट म्हणून सहभागी झाला होता. यापूर्वी नेहा आणि रोहनच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ कमालीचे लोकप्रिय झाले होते. इंडियन आयडॉलच्या कार्यक्रमात नेहाने आपल्याला पुन्हा एकदा वेगळ्या पध्दतीने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. लग्न झाल्यानंतर तिनं आपल्या गायनाला सुरुवात केली आहे. 

शाहरुख खानचा नवीन वर्षातील पहिला व्हिडिओ, दिली आगामी सिनेमाची हिंट​

त्याचे झाले असे की, भारतातील प्रसिद्ध म्युझिकल शो इंडियन आयडॉलच्या 13 व्या सिझनमध्ये नेहाचा पती रोहन हा गेस्टमध्ये सहभागी झाला होता. यावेळी नेहाने आपलं मत व्यक्त केलं. ती म्हणाली, मला व्हाईटफिटमध्ये एकदा लग्न करायचे आहे. एक गायक म्हणून मी माझ्या हिंदू रीतीरिवाज पद्धतीने लग्न केलं आहे. आता मला पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने विवाहबद्ध व्हायचं आहे. ख्रिश्चन धर्मातील रिवाजानुसार लग्न करायचे आहे. अशी माझी इच्छा आहे. 

अक्षय कुमार फोन चार्ज करण्यासाठी शोधत होता चार्जर पॉईंट, मग पाहा काय झालं...​

नेहाने एका मुलाखतीत असे सांगितले होते की, रोहनने तिला नशेत असताना एकदा प्रपोझ केले होते. नेहू मी तुझ्याशिवाय राहू शकणार नाही, चल आता आपण लग्न करूया, मला वाटते त्यावेळी त्याने दोन ते तीन बियर प्यायल्या असतील तेव्हाच तो अशा प्रकारे बोलत होता. मला वाटलं होतं की तो जे काही बोलला ते सकाळ पर्यत विसरून जाईल. प्रत्यक्षात तसे झाले नाही.

- मनोरंजन क्षेत्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image
go to top