‘आयसर’मध्ये विज्ञान प्रयोग पाहण्याची संधी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सकाळ एनआयई (न्यूज पेपर इन एज्युकेशन), अगस्त्य फाउंडेशन व आयसर पुणेमधील सेंटर ऑफ एक्‍सलन्स इन सायन्स अँड मॅथेमॅटिक्‍स एज्युकेशन यांच्या वतीने शुक्रवार (ता. १४) व शनिवारी (ता. १५) विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आयसर, पाषाण रोड येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे.

या प्रदर्शनात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित या विषयांच्या मूलभूत संकल्पनांवर आधारित प्रयोग मांडण्यात येणार आहेत. कृषी रोबोट, हरभरा तोडणी यंत्र, सौरपपं, सौरऊर्जेवरील गवत कापणी यंत्र, स्वयंचलित रेल्वे, चौकोनी चाकाची सायकल, कमी दाबाने हवेत तरंगणारे चेंडू, गणितामधील पूर्णांक व अपूर्णांक समजण्यासाठी विविध प्रतिकृती, मूलद्रव्यांची आवर्तसारणी, ऋतुचक्र यांसारख्या विज्ञान प्रतिकृती असणार आहेत. प्रदर्शनासोबत विविध कार्यक्रमांचे आयोजनसुद्धा करण्यात आले आहे. 

या प्रदर्शनामध्ये पुण्यामधील आयुका, पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क, विज्ञान वाहिनी व कराडमधील डॉ. कल्पना चावला सायन्स सेंटर या संस्था तसेच अहिल्यादेवी मुलींची शाळा, मॉडर्न हायस्कूल गणेशखिंड, भारतीय विद्या भवन स्कूल, एनसीएल स्कूल व भारत इंग्लिश स्कूल या शाळांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. आयसर प्रवेशद्वारापासून दर अर्ध्या तासाला प्रदर्शन स्थळापर्यंत बसची व्यवस्था करण्यात आली आहे.

Web Title: Science Experiment NIE