सामाजिक बांधिलकी जपणारी "सायन्स ऑन व्हिल्स' 

barge.JPG
barge.JPG


अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन ट्रस्टचा अनोखा उपक्रम 

पुणे ः पुस्तकात वाचून मुलांच्या काही गोष्टी लक्षात राहत नाही, परंतु तीच गोष्ट त्यांना प्रयोग करून दाखविण्यात आली, ती चटकन लक्षात राहते, हाच धागा पकडून पुणे शहर व परिसरातील गरीब विद्यार्थ्यांसाठी बंगळूरस्थित अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने मोफत फिरत्या प्रयोग शाळेचा अनोखा उपक्रम राबविला जात आहे. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या प्रबोधनाबरोबरच अन्य सामाजिक उपक्रमही राबविले जात आहेत. विद्यार्थीही या उपक्रमात उर्त्स्फूतपणे सहभागी होताना दिसत आहे. 

बालेवाडी, म्हाळुंगे, पाषाण, सोमेश्वरवाडी, औंधमधील महापालिका, तसेच जिल्हा परिषदेच्या ज्या शाळांमध्ये प्रयोगशाळा नाहीत, अशा शाळांमध्ये विज्ञान विषयासाठी लागणारे प्रयोगाचे सर्व साहित्य घेऊन एक छोटी बस येते. यातील दोन शिक्षिका इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या मुलांना प्रत्यक्ष प्रयोग करण्यासाठी मार्गदर्शन करतात व त्यांच्याकडून ते करून घेतात. 
बालेवाडीतील बाबूराव बालवडकर प्राथमिक विद्या मंदिरात आठवड्यातून एकदा ही बस येते. ही बस सुंदररीत्या रंगविली असल्याने मुलेही लगेचच या बसकडे आकर्षित होतात. मुलांमध्ये फक्त पुस्तकी ज्ञानातून नाही, तर प्रत्यक्ष प्रयोग करून विज्ञान विषयाची गोडी वाढविण्यासाठी हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे येथील शिक्षकांनी सांगितले. 

"अगस्त्या'कडून मुलांचे प्रबोधन 
या उपक्रमात केवळ विज्ञानाचेच प्रयोग केले जातात, असे नाही तर विद्यार्थ्यांचे सामाजिक प्रबोधनही केले जाते. मुलांना झाडांचे महत्त्व पटवून देऊन त्यांच्याकडून वृक्षारोपण करून घेतले जाते. एखादा सण असेल तर तो आपण का साजरा करतो, याबद्दल गोष्टीरूप माहिती देणे, तसेच मुलांकडून भेटकार्ड, राखी, पणत्या रंगविणे, चित्रकला स्पर्धा, मेंदी स्पर्धा आयोजित करणे, तसेच कामगारांच्या मुलांसाठी हिवाळी, उन्हाळी शिबिर भरविण्याचे कामही केले जाते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com