उद्योगांनी संशोधनात सहभाग घ्यायला हवा; राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनी शास्त्रज्ञांचे आवाहन

Scientists appeal on National Technology Day about industry participation in research
Scientists appeal on National Technology Day about industry participation in research

पुणे : प्रयोगशाळांपूरते मर्यादित संशोधन जलद गतीने लोकांच्या उपयोगात यायला हवे. त्यासाठी सुरवातीपासूनच उद्योगांनी संशोधनात सहभाग घ्यायला हवा, असे मत देशातील सर्वोच्च पदावरील शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या (डीएसटी) वतीने आयोजित ऑनलाइन राष्ट्रीय विज्ञान दिनाचा कार्यक्रम हा सुर उमटला. 

पुण्यातील "या' भागात १० दिवस असणार कडक बंद 

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्ष वर्धन, देशाचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रा. के. विजयराघवन, नीती आयोगाचे सदस्य व्ही.के. सारस्वत, डीएसटीचे सचिव प्रा. आशुतोष शर्मा, जागतिक आरोग्य संघटनेच्या उपमहासंचालीका डॉ. सौम्या स्वामिनाथन, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजचे अध्यक्ष विक्रम किर्लोस्कर आदी ऑनलाइन चर्चासत्रात सहभागी झाले होते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भविष्यात "अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भूमिका' या मध्यवर्ती विषयावर तज्ज्ञांनी मते मांडली. कोरोना विरुद्धच्या लढाईत देशातील विज्ञान आणि उद्योग विश्‍वाचे केलेल्या कामाचीही मांडणी यावेळी करण्यात आली. भविष्यकालीन अर्थव्यवस्थेचा वेधही यात घेण्यात आला. 

पुण्यात बघता बघता येरवडा परिसर बनला कंटेन्मेंट झोन

 कोविड19 विरुद्धची त्रिसूत्री: 
देशातील शास्त्रज्ञांनी कोरोना विरुद्ध लढताना निदान व वैद्यकीय साहित्य, औषधे आणि लस या त्रिसूत्रीचा अवलंब केला आहे. त्यासाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्था (सीएसआयआर), भारतीय वैद्यक संशोधन संस्था (आयसीएमआर), विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो), संरक्षण संशोधन विकास संस्था (डीआरडीओ), विद्यापीठे आणि इतर संशोधन संस्थांनी महत्त्वपूर्ण सहभाग नोंदविला आहे.

पुण्याच्या सुपर आजीबाईंना, कोरोनाला हरवले

1) लस (प्रतिजैविके): 
- लसींच्या बाबतीत भारत जगातील सर्वात मोठा उत्पादक 
- देशामध्ये कोरोना विरुद्ध लस शोधण्यासाठी 30 गट कार्यरत 
- जागतिक संशोधनात सहभाग, संशोधनाचे नेतृत्व आणि प्रत्यक्ष स्वदेशी संशोधन अशा तीन क्षेत्रात कार्य 
- वेळ, पैसा आणि कौशल्याची समांतर गुंतवणूक करण्यात आली 
- देशातील स्टार्टअपचा मोठ्या प्रमाणावर सहभाग 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

2) औषधे: 
- उपलब्ध औषधांच्या आधारे कोरोनावरील उपचार पद्धती विकसित केली 
- औषधांच्या पुणर्वापरासंबंधी संशोधन आणि विकासाचे कार्य सुरू 
- नवीन औषधांवरील संशोधन 

आणखी वाचा- पुण्याच्या सुपर आजीबाईंना, कोरोनाला हरवले

3) निदान आणि वैद्यकीय साहित्य: 
- कोरोनाच्या निदानासाठी स्वदेशी किट विकसित केले 
- आरएनए पासून डीएनए विकसित करणाऱ्या रियल टाइम पॉलिमर चेन रिऍक्‍शनवर आधारित तंत्रज्ञान 
- अँटीजन, अँटीबॉडी, अलिझा, क्रिस्पर आणि बायोमार्करवर झाले संशोधन आणि किटचे उत्पादन सुरू 
- कापड उद्योगाच्या साहाय्याने आधुनिक पद्धतीने मास्कचे उत्पादन घेण्यात आले 
- पर्सनल प्रोटेक्‍शन किटच्या उत्पादनासाठी उद्योग सरसावले 
- देशातच व्हेंटिलेटर विकसित करण्याची प्रक्रिया जलद गतीने सुरू 

भारीच की ! पुणे जिल्हा शिक्षण मंडळाकडून गुगल क्‍लासरूम सुरू 

भविष्यात इथे गुंतवणूक हवी 
- दूरस्थ संवाद माध्यम आणि तंत्रज्ञान 
- विभागवार (जीओस्पेशीयल) माहितीचे समन्वय आणि इतर फॅसिलीटी 
- रुग्णालये, उद्योग आणि घरातील वापरासंबंधीच्या उत्पादनांमध्ये नवसंशोधन 
- सेवा क्षेत्रात डिजिटल मॅपींग आणि डिलिव्हरी 
- रोबोटीक्‍स, रिमोट कंट्रोल आदींचा उद्योगक्षेत्रात वापर 
- संसर्गजन्य आजार, उद्योग आणि सेवांचे संचालन यासाठी कृत्रीम बुद्धिमत्तेचा वापर 
- शाश्‍वत विकासासाठी संशोधन आणि विकास 

पुणेकरांनो, सावधान ! 'या' भागात वावरतोय बिबट्या

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप महत्त्वपूर्ण असणार आहे. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी विविध पर्यायांचे सिम्युलेशन आणि मॉडेलिंग करणारे तीस गट देशभरात कार्यरत आहे. यातून राष्ट्रीय स्तरावर सुपर मॉडेल विकसित करण्यात येत आहे. 
- प्रा.आशुतोष शर्मा, सचिव, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग. 

कोविड-19 विरुद्धच्या लढाईत देशातील सर्व वैज्ञानिक संस्थांसह उद्योगविश्वानेही समन्वय साधला. कोरोनानंतरही यांमधील परस्पर सहकार्य टिकविण्यासाठी आवश्‍यक प्रशासकीय बदल आम्ही करत आहोत. यामुळे केवळ कोरोनासाठी नाही तर सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात मोठी मदत होणार आहे. 
- डॉ.हर्ष वर्धन, केंद्रीय आरोग्य मंत्री. 

पिस्तूल घेऊन तिघे फिरत होते, मग पोलिसांची झाली एंट्री... 

कोरोना ही केवळ जागतिक माहामारी नाही तर माहितीची महामारी सुद्धा आहे. भारताशिवाय संपूर्ण जगातील लसीचे टिकाकरण शक्‍य नाही. लसीच्या संशोधनासाठीही भारताने नवीन कल्पनांना चालना देणे गरजेचे आहे. त्यासाठी जागतिक सहकार्य आवश्‍यक आहे. 
- डॉ. सौम्या स्वामिनाथन, उपमहासंचालीका, जागतिक आरोग्य संघटना. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com