

Grand Palanquin Procession and Shahi Snan Mark Somvati Amavasya Festivities in Jejur
sakal
जेजुरी: दीड वर्षानंतर आलेली सोमवती अमावस्या, अधिक मास आणि सुट्यांमुळे जेजुरीच्या खंडोबा गडावर भाविकांचा जनसागर लोटला. सुमारे तीन लाख भाविकांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषात खंडोबाचे दर्शन घेतले. मध्यरात्री दोन वाजता निघालेल्या पालखी सोहळ्याने सकाळी सात वाजता कऱ्हा नदीवर शाही स्नान केले.