

Rescue teams at Gunjavani Dam after two brothers drowned in a tragic incident in Rajgad taluka.
sakal
-मनोज कुंभार
वेल्हे(पुणे): घेवंडे (ता.राजगड) येथील गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची मोटर सरकवताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवार (ता.12) रोजी घडली होती. यामध्ये धाकट्या भावाचा मृतदेह हा रविवार रात्री उशिरा मिळाला होता तर थोरला भाऊ दत्तू गायकवाड यांचा मृतदेह सोमवार (ता.13) रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन टीम व स्कुबा टीमला यश मिळाले असल्याची माहिती वेल्ह्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांनी दिली.