esakal | बाणेरमध्ये साकारतेय दुसरे कोविड केअर हॉस्पिटल

बोलून बातमी शोधा

Second Covid Care Hospital in Baner
बाणेरमध्ये साकारतेय दुसरे कोविड केअर हॉस्पिटल
sakal_logo
By
शितल बर्गे

बाणेर : कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता बाणेर येथील सर्वे नंबर 33 मध्ये साधारण एकवीस हजार चौरस फूट चे 60 आय. सी. यु. बेड तर 150 ऑक्सिजन बेड असणारे असे एकूण 210 बेडचे हॉस्पिटल साकारत असून साधारणतः महिनाभरात हॉस्पिटल सुरू होणार असून महापौर मुरलीधर मोहोळ,आयुक्त विक्रमकुमार तसेच या भागातील नगरसेवकांनी या ठिकाणी भेट देऊन हॉस्पिटलची पाहणी केली.

राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार व पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या विचारविनिमयाने महापालिकेच्या पुढाकाराने व मालपाणी ग्रुपच्या सहकार्याने त्यांच्या C2 आरक्षित जागेत बांधण्यात आलेल्या सि. एस. आर. फंडातून साधारणतः एकवीस हजार स्क्वेअर फूट इमारत ही महापालिकेला हस्तांतरित केली असून, या ठिकाणी 60 आय. सी. यु. बेड व 150 ऑक्सिजन बेड असे 210 बेडचे कोविड हॉस्पिटलचे काम ठिकाणी सुरू झाले असून साधारणतः महिनाभरात या ठिकाणी हॉस्पिटल सुरू होणार आहे. या हॉस्पिटल मुळे बाणेर, बालेवाडी,पाषाण, सुतारवाडी सोमेश्वरवाडी,म्हाळुंगे या भागातील नागरिकांना तसेच शहराच्या इतर भागातील नागरिकांनाही या कोरोना काळामध्ये मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा: अकरावीसह आयटीआय, पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी रंगणार चुरस

हेही वाचा: 14 ऑक्सिजन प्लॅंटच्या खरेदीसाठी 48 तासांत जमा झाला 13 कोटींचा निधी

याठिकाणी महापौर मुरलीधर मोहोळ, आयुक्त विक्रम कुमार, सभागृह नेते गणेश बिडकर यांनी आज या हॉस्पिटलच्या कामाची पाहणी केली.यावेळी महापौर यांनी महापौर निधीतून दीड कोटी रुपये या हॉस्पिटल साठी निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. त्याचबरोबर या कामासाठी कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही असे आश्वासनही महापौरांनी दिले. त्याच बरोबर इथे या हॉस्पिटलसाठी 1000 एल. पी. एम. या क्षमतेचे चार ऑक्सिजन जनरटिंग प्लांट बसवणार आहेत , तसेच लिक्विड ऑक्सिजन प्लांट ही महिनाभरात बसवणार असल्याची माहिती शहर अभियंता प्रकाश वाघमारे यांनी मान्यवरांना दिली. या

या हॉस्पिटलची पाहणी करत असताना या भागातील नगरसेवक बाबुराव चांदेरे, नगरसेवक अमोल बालवडकर,नगरसेविका ज्योती कळमकर,प्रल्हाद सायकर, डॉ. सागर बालवडकर, समीर चांदेरे उमा गाडगीळ तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.