

Night Ordeal Near Khadakwasla Dam Ends Safely Thanks to Security Guard
sakal
पुणे : खडकवासला धरण परिसरात रात्री नऊच्या सुमारास १५ ते १६ वर्षाच्या युवतीला तिचा मित्र एकटीला सोडून निघून गेला होता. त्यावेळी ती अंधारात एकटीच उभी होती. मात्र, धरण परिसरातील सुरक्षारक्षक हरिदास कुंडलिकराव वऱ्हाड यांच्या सतर्कतेमुळे तिला वेळेवर मदत मिळाली आणि पोलिसांच्या माध्यमातून ती सुखरूप घरी पोहोचली.