
Security guards and Pune municipal employees protest against unpaid salaries and bonus denial as contractors dominate payroll decisions.
Sakal
पुणे : महापालिकेतील कर्मचाऱ्यांना हजारो रुपयांचा बोनस जमा झाला, कंत्राटी कामगारांनाही पगार वाढवून मिळाला, असे असताना परिमंडळ तीनमधील १६५ कंत्राटी सुरक्षारक्षकांना बोनस मिळाला नाही. त्यातील ६५ जणांना वेतनही मिळाले नाही. त्यामुळे कर्मचारी हवालदिल झाले आहेत. अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला संपर्क केला, तरीही त्याने प्रतिसाद दिला नाही, अशी अवस्था झाल्याने कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होत नसल्याचे समोर आले आहे.