स्वारगेट ते कात्रज साडेपाच किलोमीटर भुयारी मेट्रोसाठी किती खर्च आहे पहा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

महामेट्रोकडून सादर करण्यात आलेल्या स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल. प्रकल्पासाठी महापालिकेच्या हिश्‍शाची रक्कम देऊ.
- मुरलीधर मोहोळ, महापौर

पुणे - स्वारगेट ते कात्रज हा सुमारे साडेपाच किलोमीटरचा मेट्रो मार्ग भूमिगत करण्याचा प्रस्ताव असून, त्यासाठी सुमारे ४ हजार २०० कोटी रुपये खर्च येणार असल्याची माहिती महामेट्रोने महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना बुधवारी सादरीकरणाद्वारे दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या विस्तारित मार्गाच्या सविस्तर प्रकल्प आराखड्याचे (डीपीआर) सादरीकरण बुधवारी महामेट्रोकडून महापालिकेला करण्यात आले. जवळपास साडेपाच किमीच्या या मार्गासाठी ४ हजार २०० कोटी इतका खर्च येणार आहे. शहरात पहिल्या टप्प्यात वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी- चिंचवड या मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. त्यात स्वारगेट ते कात्रज या मार्गावर मेट्रो प्रकल्प राबविण्याची मागणी या भागातील सर्वपक्षीय नगरसेवकांकडून करण्यात आली होती. त्यानुसार महापालिकेने या मार्गाचा प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्याचे काम गेल्यावर्षी महामेट्रोला दिले होते.

फास्टटॅग असूनही जावे लागते ‘स्लाे’

रामनाथ सुब्रह्मण्यम यांनी या डीपीआरचे सादरीकरण महापौर मुरलीधर मोहोळ आणि आयुक्त सौरभ राव यांच्यासमोर केले. सुमारे ५.४ किलोमीटरचा संपूर्ण प्रस्तावित मार्ग भुयारी असेल, त्यासाठी ४ हजार २०३ कोटी इतका खर्च होणार आहे. महामेट्रोच्या डीपीआरनुसार सातारा रस्त्यावरील मार्गाप्रमाणेच आखण्यात आला आहे. त्यावर पुष्पमंगल चौक, शंकर महाराज मठ आणि राजीव गांधी उद्यान अशी स्टेशन असतील. भुयारी मेट्रोच्या तुलनेत एलिव्हेटेड मेट्रोचा खर्च अत्यल्प आहे. मात्र, काही लोकप्रतिनिधींच्या आग्रहामुळे भुयारी मेट्रोचा प्रस्ताव तयार केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: See how much it costs for the underground from Swargate to Katraj