अवैद्य दारूसाठ्यासह सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त;स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

Daund police
Daund police

राहू - पाटेठाण (ता. दौंड) येथील हद्दीत  एका चारचाकी गाडीत विक्रीसाठी घेऊन चाललेला अवैद्य दारूसाठयासह सव्वादोन लाखाचा मुद्देमाल सोमवार (ता. 4) मध्यरात्रीच्या सुमारास जप्त करण्यात आला . अशी माहिती पुणे  स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील टाकळी भिमा ते पाटेठाण  रस्त्यावर  पेट्रोलिंग करीत असताना सदर पोलीस पथकास एका खबऱ्या मार्फत बातमी मिळाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी आरोपी सुरज निवास किरो वय ३४ वर्षे रा. पाठेटाण (ता.दौंड)  याच्यावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.  सुरज किरो हा दरम्यानच्या कालावधीत एका चार चाकी गाडीमध्ये त्या रस्त्यावरून वारंवार ये-जा करित असताना पोलिसांना संशय बळावला. त्याच्या चारचाकी गाडीची अधिक तपासणी केली असता. अवैध दारू साठ्याचे बॉक्स गाडीच्या शीटखाली आढळले . पोलीसांना संशय येऊ नये म्हणून दारूच्या बॉक्सवर भाजी पाला ठेवत अनेक दिवसांपासून दारू विक्री करत होता . पिण्याच्या पाण्याच्या ज्यारमध्ये तो गावठी दारू विक्रीसाठी ठेवत होता. सदर आरोपीला मुद्देमालासह यवत पोलिसांच्या ताब्यात दिला आहे . ग्रामपंचायत निवडणुकांच्या कालावधीत अवैध दारूसाठा  कोठे विक्रीसाठी नेमका कुठे नेणार होता. याबाबतचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, अजिंक्य दौंडकर करत आहे.

पुणे जिल्हयातील ग्रामपंचायत निवडणुकीचे अनुषंगाने अवैध धंदयावर कारवाई करणेसाठी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी आदेश दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस पथकातील सहाय्यकपोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे,  महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरू गायकवाड यांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सदर कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com