Pune Crime : दहशतवाद्यांनी वापरलेली वाहने जप्त; एनआयएची कोंढव्यात कारवाई

दहशतवादी कट रचल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) कोंढव्यात शनिवारी कारवाई करण्यात आली.
NIA
NIAesakal

पुणे - दहशतवादी कट रचल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) कोंढव्यात शनिवारी कारवाई करण्यात आली. या कारवाईत दहशतवाद्यांनी वापरलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत.

पुणे, मुंबईसह देशभरातील प्रमुख शहरात बाँम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांनी एनआयए आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) गेल्या वर्षी कोंढव्यातून अटक केली होती. दहशतवाद्यांच्या चौकशीत त्यांनी वापरलेली वाहने कोंढव्यात ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानंतर एनआयएचे पथक कोंढव्यात आले. एनआयएच्या पथकाने दहशतवाद्यांनी वापरलेली वाहने जप्त केली.

मुंबई-पुण्यासह गुजरातमधील महत्त्वाच्या शहरात बाँम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत असलेल्या आयसिसच्या दहशतवाद्यांनी बाँम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे एनआयएने केलेल्या तपासात उघड झाले आहे. त्यानंतर १६ मार्च रोजी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) कोंढव्यात दहशतवादी वास्तव्यास असलेली सदनिका जप्त केली होती.

यांना करण्यात आली आहे अटक -

या गुन्ह्यात एनआयएने महम्मद शहनाझ आलम, रिझवान अली, अब्दुलाह शेख, तलाह लियाकत खान, महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ मटका ऊर्फ अमीर अब्दुल हमिद खान (रा. रतलाम, मध्य प्रदेश), महम्मद युनूस महम्मद याकूब साकी ऊर्फ आदिल ऊर्फ आदिल सलीम खान (रा. रतलाम, मध्य प्रदेश), कादीर दस्तगीर पठाण ऊर्फ अब्दुल कादीर, समीब नासीरउद्दीन काझी (दोघे रा. कोंढवा, पुणे), जुल्फीकार अली बडोदवाला ऊर्फ लालाभाई ऊर्फ लाला ऊर्फ सईफ, शमिल साकिब नाचन आणि आकिफ अतिक नाचन (तिघेही रा. पडघा, ठाणे) यांना अटक करण्यात आली आहे.

तपासात उघडकीस आलेल्या बाबी -

महम्मद आलमला कोथरूड परिसरात दुचाकी चोरताना पोलिसांनी पकडले होते. त्यानंतर त्याला तपासासाठी एनआयएच्या ताब्यात देण्यात आले. दहशतवाद्यांनी सातारा जिल्ह्यातील एका वस्त्रदालनात दरोडा टाकून त्यांनी बाँम्बस्फोटाचे साहित्य खरेदी केले होते. कोंढव्यात त्यांनी बॉम्ब कसा तयार करायचा याबाबतचे प्रशिक्षण घेतले होते.

कोल्हापूर, सातारा परिसरातील जंगलात त्यांनी नियंत्रित पद्धतीने बॉम्बस्फोट केले होते. त्यांनी शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे तपासात उघड झाले होते. त्यानंतर एनआयएच्या पथकाने कोंढव्यातील मिठानगर परिसरातील सदनिका जप्त केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com