महाराष्ट्र विज्ञान अकादमीच्या ‘फेलों’ची निवड | MASC Selection | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्र विज्ञान अकादमीच्या ‘फेलों’ची निवड
महाराष्ट्र विज्ञान अकादमीच्या ‘फेलों’ची निवड

महाराष्ट्र विज्ञान अकादमीच्या ‘फेलों’ची निवड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्याच्या वैज्ञानिक क्षेत्रातील आघाडीची संस्था महाराष्ट्र विज्ञान अकादमीने (एमएएससी) या वर्षीच्या फेलोंची आणि युवा वैज्ञानिकांची निवड केली आहे. आपआपल्या क्षेत्रात उत्कृष्ट संशोधन कार्य केलेल्या मराठी वैज्ञानिकांची या अकादमीवर निवड करण्यात आली आहे, अशी माहिती अकादमीचे सचिव डॉ. भरत काळे यांनी दिली.

राज्याला भेडसावणाऱ्या वैज्ञानिक आणि तांत्रिक समस्यांच्या निराकरणासाठी, तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रचारासाठी १९७६ मध्ये अकादमीची स्थापना करण्यात आली होती. दरवर्षी अकादमी फेलो आणि यंग असोसिएट्सची निवड करतात. अकादमीत फेलो म्हणून एक हजारहून अधिक शास्त्रज्ञ आणि ५० हून अधिक यंग असोसिएट्स कार्यरत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नव्या ३१ फेलो आणि २३ युवा सहकारी शास्त्रज्ञांची निवड करण्यात आली. अकादमीचे अध्यक्ष प्रा. जी.डी. यादव यांनी संबंधितांना शपथ दिली.

हेही वाचा: बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणीला सुरवात

फेलो -

रसायनशास्त्र (१३) - भुसारे सुधाकर रघुनाथराव (ज्ञानोपासक महाविद्यालय, परभणी), बी.आर. साठे (बामू, औरंगाबाद), एस.जे. घारपुरे (आयआयटी मुंबई), एस. एस. कुलकर्णी (आयआयटी मुंबई), एम.जी.चासकर (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), जी.बी. कोळेकर (कोल्हापूर), एम.बी. गावंडे (आयसीटी, जालना), एस.डी. देऊळेकर(कोल्हापूर), एन.टी. पाटील (आयसर, भोपाळ), व्ही. आर. पाटील (मुंबई विद्यापीठ), व्ही.जी. गुप्ता (बीएआरसी, मुंबई), व्ही.बी. गायकवाड (केटीएचएम, नाशिक), तालुकदार पी. (आयसर, पुणे)

भौतिक विज्ञान (६) - पी.एम. शिरगे(आयआयटी, इंदूर), एस.ए. वाघुले (अमरावती), आर.एस.देवेन (आयआयटी, इंदूर), ए.डी. कुलकर्णी (सिम्बायोसिस, पुणे), पी.आर. सागदेव (आयआयटी, इंदूर), एस.ए. आचार्य ( नागपूर)

जीवन विज्ञान (५) - जी.सी. इंगवले (सिम्बायोसिस, पुणे), रश्मी तुपे (सिम्बायोसिस, पुणे), संतोष तुपे (ग्रीनव्हेंशन बायोटेक, पुणे), एस.के. सिंग (आरी, पुणे), के.एस. जोशी (सिंहगड कॉलेज, पुणे)

अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान (७) - जी.एस. शंकरलुंग (आयसीटी, मुंबई), एस.ए. मांडवगणे (व्हीएनआयटी, नागपूर), ए.बी.प्रताप (आयसीटी, मुंबई), एस.व्ही. जोशी (आयसीटी, मुंबई), पी.व्ही. उपरा. बालसुब्रमण्यम के. (डीआयएटी), ए. सहस्त्रबुधे (एआयसीटीई)

हेही वाचा: 'MBBS'च्या शंभर जागांना आयोगाची मंजुरी

यंग असोसिएट्स -

रसायनशास्त्र (१२) - एस.आर. माने, के.आर. गोरे, एस.के गुप्ता,एम.एस. तांबोळी, आर. चौहान, एन.के. चौधरी, ए.एल. पुयाड, एस.यू. नंदनवार, एच.एम.यादव, के.सी. बडगुयार, मोडक बी., गुलेरिया ए.

भौतिक विज्ञान (५) - एस.आर. रोंदिया (यूके), एस.के. कोळेकर (यूएसए), जी.जी. उमरजी, एम.त्यागी, डी.वाय. नादर्गी

जीव विज्ञान (3) - एस.मित्तल, आर. बन्सल, ई.के. पठाण

वैद्यकशास्त्र (१) - पाटील-भोळे टी

अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान (२) - आर.व्ही. कानवडे, एस.एस. चव्हाण

loading image
go to top