Pune : पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनची सहकार क्षेत्रातील प्रशिक्षणासाठी राज्य शिखर संस्था म्हणून निवड

सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र फेडरेशनचे उपाध्यक्ष विनायकराव तांबे यांच्याकडे सुपूर्त
selection of pune district urban cooperative patsanstha federation as rajya shikhar saunstha for training dilip walse patil honored
selection of pune district urban cooperative patsanstha federation as rajya shikhar saunstha for training dilip walse patil honoredSakal

Manchar News : पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन संस्थेला राज्यातील सहकार क्षेत्रासाठी शिक्षण व प्रशिक्षणासाठी राज्य शिखर संस्था म्हणून मान्यता सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

याबाबत निवडीचे पत्र वळसे पाटील यांच्या हस्ते मंचर (ता आंबेगाव) येथे शनिवारी (ता. १०) पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष विनायकराव तांबे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.

तांबे म्हणाले, “पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे (स्व) आमदार शिवाजीराव भोसले प्रशिक्षण केंद्र पुण्यात आहे. फेडरेशनने आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील पतसंस्थांच्या आठ हजार ७२९ प्रतिनिधिना प्रशिक्षण दिले आहे.

सहकार क्षेत्र अधिक सक्षम व्हावे या उद्देशाने संस्थाना प्रशिक्षण देण्याचे काम गेली अनेक वर्ष फेडरेशन करत आहे. या कामाची दखल घेऊन व फेडरेशनच्या मागणीचा विचार करून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग सहकार,

पणन व वस्त्रोद्योग विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या मान्यतेने जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनला राज्यातील सहकार क्षेत्रातील पतसंस्था, बँका, गृहनिर्माण, साखर कारखाने,

वस्त्रोद्योग यामध्ये काम करणारे पदाधिकारी कर्मचारी यांना शिक्षण व प्रशिक्षण देण्यासाठी राज्य शिखर संस्था म्हणून फेडरेशनला मान्यता दिली आहे. राज्य पातळीवरील प्रशिक्षणाचा शुभारंभ प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी लवकरच केला जाईल. वळसे पाटील यांनी दिलेल्या संधीचा उपयोग करून ग्रामीण व शहरी भागातील संबंधिताना अत्यंत दर्जेदार प्रशिक्षण दिले जाईल” त्यामुळे सहकार क्षेत्राला अधिक बळकटी मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com