Pune : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुणे जिल्हा ग्रामीणच्या अध्यक्षपदी स्वप्निल गायकवाड यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख यांनी स्वप्निल गायकवाड यांना निवडीचे पत्र दिले
selection of Swapnil Gaikwad as President of Pune District Rural of Nationalist Youth Congress
selection of Swapnil Gaikwad as President of Pune District Rural of Nationalist Youth Congresssakal

तळेगाव ढमढेरे : कोंढापुरी (ता.शिरूर) येथील माजी सरपंच व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष स्वप्निल अरुणराव गायकवाड यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे जिल्हा ग्रामीणच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख यांनी स्वप्निल गायकवाड यांना निवडीचे पत्र दिले आहे. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील, खासदार सुप्रिया सुळे व डॉ. अमोल कोल्हे, आमदार ॲड.अशोक पवार,

युवकचे अध्यक्ष महबूब शेख, शिरूर बाजार समितीचे माजी उपसभापती विश्वास ढमढेरे, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष राजेंद्र नरवडे, उद्योजक विनय गायकवाड, माजी उपसरपंच विजय ढमढेरे, संचालक संजय काळे, श्याम काळे, सुरेश कोल्हे, योगेश गायकवाड, अनिल देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

निवडीनंतर जिल्हाध्यक्ष स्वप्निल गायकवाड यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान, जिल्हा बँकेचे माजी संचालक स्वर्गीय अरुणआबा गायकवाड यांचे सुपुत्र स्वप्निल गायकवाड यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे युवकांचे संघटन करण्यासाठी संधी देण्यात आली आहे. आमदार ॲड.अशोक पवार व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे कट्टर समर्थक म्हणून स्वप्निल गायकवाड यांची ओळख आहे.

selection of Swapnil Gaikwad as President of Pune District Rural of Nationalist Youth Congress
Pune Crime News : पुण्यात पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या! सात महिन्यांची चिमुरडी झाली पोरकी; परिसरात एकच खळबळ

पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात संघटनात्मक कामाला प्रथम प्राधान्य देणारा असून, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संघटनात्मक काम मी करणार आहे असे निवडीनंतर सकाळशी बोलताना स्वप्निल गायकवाड यांनी सांगितले.

दरम्यान, स्वप्निल गायकवाड यांची युवक काँग्रेसच्या जिल्हा ग्रामीणच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिरूर तालुक्यामध्ये अनेक युवकांनी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून स्वागत केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com