कार्यशाळेत विद्यार्थीनींना स्वसंरक्षणाचे धडे

संदिप जगदाळे
मंगळवार, 29 मे 2018

हडपसर (पुणे) : वर्दळीची ठिकाणे, कॉलेज परिसर किंवा तत्सम ठिकाणी महिलांना छेडछाडीली नेहमीच सामोरे जावे लागते. पण महिला जर सक्षम असतील, तर अशा विचित्र प्रसंगापासून स्वत:चा बचाव करु शकतात. यासाठी साधना शैक्षणिक संकुलातील विद्यार्थींनींना मोफत स्वरंक्षणाचे धडे दिले जात आहेत. महिना भराचे हे प्रशिक्षण असून पालक वर्गातून या प्रशिक्षणाचे कौतुक होत आहे.

रयत शिक्षण संस्थेच्या साधना शैक्षणिक संकुलात हे प्रशिक्षण दिले जात आहे. संस्थेच्या पश्चीम विभागातील ६६ शाळांमधील विद्यार्थीनी या प्रशिक्षणात सहभागी झाल्या आहेत. बहुतांश विद्यार्थीनी या ग्रामिण भागातील आहेत.

स्पर्धेच्या युगात महिलांना कोणतेच क्षेत्र वर्ज राहिलेले नाही. त्यामुळे त्यांचा नेहमीच सार्वजनिक ठिकाणी वावर असतो. विशेषत: वर्दळीच्या ठिकाणी अचानक हल्ला किंवा छेडछाड झाल्यास त्यापासून बचाव कसा करावा याबाबत मार्गदर्शन या प्रशिक्षणात करण्यात येत आहे. अचानक झालेल्या हल्ल्याच्या प्रसंगी पाणी बॉटल, स्टेशनरी साहित्य, खेकडा पीन, बांगड्या, छत्री, चावी, पेन, शुज, शॅन्डल, शॅक व ओढणीचा वापर करुन आपली सुटका कशी करुन घ्यावी याची प्रात्यक्षिके शिकवली जात आहेत. तसेच कराटे प्रशिक्षण दिले जात आहे. लिफ्ट, गार्डन, शाळा, महाविदयालय, बाजारपेठ अशा सार्वजनिक ठिकाणी प्रत्येक वस्तूचा कशा पद्धतीने वापर करावा याबाबतचे प्रशिक्षण सहभागी विद्यार्थींनीना प्रशिक्षक विजय फरगडे देत आहेत. 

फरगडे म्हणाले, मुलींनी स्वसंरक्षणाचे धडे घेऊन निर्भय बनावे, समाजामध्ये वाढत चाललेली विषमता, धकाबुकीच्या जीवनात मुलींनी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जीवन जगले पाहिजे. यासाठी मुलींनी स्वतः स्वयंपूर्ण होऊन स्वतःचे रक्षण स्वतः करून मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, समाजामध्ये चांगल्या मानसन्मानाने जगता यावे हा या प्रशिक्षणाच्या पाठीमागचा उद्देश आहे. या उपक्रमासाठी नगरसेवक चेतन तुपे, दिलीप तुपे, विजय तुपे, मल्हारी चौधरी, प्राचार्य संजय मोहिते यांचे सहकार्य लाभले.

Web Title: self defense training at workshop to the girls