World Book Day : ‘पुस्तकांबरोबर सेल्फी’ची आज शेवटची संधी ; जागतिक पुस्तक दिनानिमित्त आयोजन

जागतिक पुस्तक दिनानिमित्त ‘सकाळ प्रकाशना’तर्फे आयोजित ‘पुस्तकांबरोबर सेल्फी’ या स्पर्धेला वाचकांचा भरघोस प्रतिसाद लाभला आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याची शेवटची संधी सोमवारी (ता. २२) आहे.
World Book Day
World Book Daysakal

पुणे : जागतिक पुस्तक दिनानिमित्त ‘सकाळ प्रकाशना’तर्फे आयोजित ‘पुस्तकांबरोबर सेल्फी’ या स्पर्धेला वाचकांचा भरघोस प्रतिसाद लाभला आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याची शेवटची संधी सोमवारी (ता. २२) आहे.

वाचकांना पुस्तकांबद्दलचे, वाचनासंस्कृतीबद्दलचे प्रेम व्यक्त करण्यासाठी ‘सकाळ प्रकाशना’ने या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी ही अनोखी स्पर्धा घेण्यात येत असून स्पर्धेला मिळणार प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे. विविध वयोगटांतील वाचकांनी स्पर्धेत आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला असून मान्यवरांनीही स्पर्धेला शुभेच्छा दिल्या आहेत. स्पर्धेत सहभाग नोंदविण्याचा आजचा शेवटचा दिवस असून वाचकांनी अधिकाधिक संख्येने यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन ‘सकाळ प्रकाशना’ने केले आहे.

ज्यांच्या घरी वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तकांचे वाचन होते, ती कुटुंबे समृद्ध होतात. त्यांच्या घरातील नव्या पिढीतही त्या ज्ञानाचे तेज दिसते. प्रत्येकाच्या घरात एक तरी पुस्तकाचे कपाट यावे. कारण अज्ञान, भेदभाव, गरिबी, द्वेष या सर्वांना कायमचे गाडून टाकण्यासाठी तेवढेच पुरेसे आहे.

- प्रफुल्ल वानखेडे,

लेखक व उद्योजक

World Book Day
Sangli Loksabha Constituency : विशाल पाटील भिडणार की ‘ऑफर’ घेणार? ; सबंध राज्याचे लक्ष

हातात पुस्तक धरून वाचण्याची जी गंमत असते, ती ‘किंडल’सारख्या अॅपमधून मिळत नाही. मला नवे तंत्रज्ञान वापरणे फारसे जमत नाही. त्यामुळे मी आजही जुन्या पद्धतीने पुस्तक मागवतो आणि वाचतो. हल्ली मुलांच्या हातात पुस्तक दिसत नाही. पण वाचनाची सवय लावण्याचा प्रयत्न करून पाहायला हवा.

- महेश मांजरेकर,

ज्येष्ठ अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक

तुम्हाला तुमच्या आवडीचे पुस्तक सापडले की आणखी पुस्तके वाचायला आवडतात. लहानपणी मला वाचण्याची सवय नव्हती. पण कोरोनाच्या काळात ही चांगली सवय लागली. जागतिक पुस्तक दिवसापासून मी नियमितपणे वाचन सुरू करणार आहे.

- भूषण प्रधान, अभिनेता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com