esakal | परदेशात फराळ पाठवताय? घाई करा! | Pune
sakal

बोलून बातमी शोधा

 दिवाळी फराळ

परदेशात फराळ पाठवताय? घाई करा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : तुमचे कोणी नातेवाईक परदेशात आहेत? त्यांना दरवर्षी तुम्ही दिवाळीचा फराळ पाठवता का? या वर्षीही पाठवणार आहात का?... या तीनही प्रश्नांची उत्तरे ‘हो’ असल्यास तुम्ही या वर्षीचा फराळ पाठवायला वेळ लावू नका. कारण, सागरी आणि हवाई वाहतुकीला प्रचंड वेळ लागत आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत फराळ पोहचण्यासाठी तो पुण्यातून लवकर पाठवा.

कोरोना उद्रेकामुळे सागरी आणि हवाई मालवाहतुकीवर थेट परिणाम झाला आहे. लॉकडाउनमुळे विस्कटलेली परदेशातील मालवाहतूक अद्यापही पूर्ववत झालेली नाही. त्याचा हा परिणाम असल्याची माहिती परदेशात मालवाहतूक करणाऱ्यांनी दिली.

फराळाच्या पार्सलमधून दहा कोटींची उलाढाल

पुण्यासह देशभरातील प्रमुख शहरांमधून परदेशातील नातेवाइकांना दिवाळी फराळ पाठवला जातो. आधीच विमानतळांवर माल अडकून पडला आहे. त्यात दिवाळीच्या फराळाचा ‘लोड’ वाढणार. त्यामुळे दिवाळी तोंडावर आल्यानंतर फराळ पाठविण्याची घाई करू नका. तो विमानतळावर अडकून राहण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या आधी पंधरा दिवसांमध्ये फराळाची पॅकेट पाठविली जातात. गेल्या वर्षीपर्यंत या पंधरा दिवसांमध्ये आठ ते दहा कोटी रुपयांची उलाढाल दिवाळी फराळाच्या पार्सलमधून होत असे.

हेही वाचा: किरण गोसावीला पुणे पोलिसांची लूक आऊट नोटीस जारी

दिवाळीचे कमी वजनाचे पार्सल असेल तर, त्याला प्राधान्याने वितरित करता येते. या वर्षी परदेशात मालवाहतुकीच्या व्यवस्थेवर मोठा ताण आहे. यात आपल्या नातेवाइकांना पाठविलेला फराळ अडकू नये याची काळजी घ्या. हा फराळ लवकर पाठवा. त्यामुळे तो वेळेत आणि सुरक्षित पोचेल.

- दिनेश कांचनदाणी, परदेशी वाहतूक व्यावसायिक

परिणाम काय झाला?

परदेशात सागरीमार्गे पाठविण्यासाठी एका कंटेनरचे भाडे यापूर्वी चार हजार अमेरिकन डॉलर्स होते. ते आता १२ ते १६ हजार डॉलर्सपर्यंत वाढले आहे. सागरीमार्गाला पर्याय म्हणून हवाई मार्गाचा वापर सुरू केला. प्रवाशांची संख्या कमी असल्याने प्रवासी विमानेही मालवाहतूक करत आहेत.पण, ही विमाने भरून मालवाहतूक होत असली तरीही पडलेल्या मालाचा तुलनेत उड्डाणांची संख्या खूप कमी आहे.

नेमके काय झाले?

  1. परदेशात मालवाहतूक करणारी जहाजे आणि कंटेनरची संख्या कमी

  2. कोरोनामुळे परदेशात कमी मनुष्यबळामध्ये काम सुरू

  3. दुसऱ्या देशात गेलेले जहाज भारतात परतण्यासाठी लागतोय वेळ

  4. हवाई वाहतुकीला प्राधान्य दिल्यास उड्डाणांची संख्या मर्यादित.

  5. सर्व प्रमुख ‘गेटवे’ आणि ‘ट्रान्झिट पॉइंट्स’मध्ये माल अडकून पडत आहे.

  6. सर्व एअरलाइन्स व बहुराष्ट्रीय कंपन्यांना फटका बसत आहे.

loading image
go to top