esakal | ज्येष्ठ कृषीशास्त्रज्ञ डॉ. भापकर यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

dr bhapkar

ज्येष्ठ कृषीशास्त्रज्ञ डॉ. भापकर यांचे निधन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे पहिले संशोधन संचालक डॉ. डी.जी. भापकर यांचे बुधवारी रात्री (वय ९२) निधन झाले. महात्मा फुले कृषि विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर १ एप्रिल १९१८ ते ऑगस्ट १९८५ या काळात डॉ. भापकर हे विद्यापीठाचे संशोधन संचालक म्हणून कार्यरत होते. (Senior agronomist Dr Bhapkar passed away)

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठात त्यांनी भात पैदासकार म्हणून उल्लेखनीय संशोधन कार्य केले. त्यांनी भात पिकाच्या विविध जाती विकसित केल्या. यामध्ये कर्जत १८४ या प्रचलीत वाणाचा समावेश आहे.संशोधन संचालकपदी असताना त्यांनी भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्याकडे विद्यापीठाचे अडीचशे संशोधनाचे प्रस्ताव पाठवून ती मंजूर झाली.

हेही वाचा: माजी आमदाराच्या निवाऱ्यासाठी अजित पवारांचा पुढाकार

उसाच्या नवीन जाती, उसापासून गूळ निर्मिती तंत्रज्ञान, बाजरी उत्पादन तंत्रज्ञान. त्याचप्रमाणे ऊस पिकामधील बटाटा, मका यासारख्या पिकांचे आंतरपीक म्हणून वापर अशा विविध बाबींवर संशोधनात त्यांचा पुढाकार होता. विद्यापीठ कर्मचार्यांसाठी राहुरी येथे कृषि विज्ञान सहकारी पतसंस्था स्थापन करण्यामागे त्यांचे मोठे योगदान होते. नवी दिल्लीच्या भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे माजी उपमहासंचालक डॉ. किरण कोकाटे यांचे ते सासरे होते.

loading image