
केंब्रिज विद्यापीठात उपयोजित गणित आणि सैद्धांतिक भौतिकशास्त्रात त्यांनी 1963 मध्ये पीएच.डी. पूर्ण केली. काही काळ त्यांनी इंग्लंडमधील लीड्स विद्यापीठात अध्यापनाचे काम केले.
पुणे : देशाच्या आधुनिक खगोलशास्त्राच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान असलेल प्रा. शशिकुमार चित्रे (वय 84) यांचे सोमवारी (ता.११) मुंबईत निधन झाले. सूर्य आणि त्याचे चुंबकीय क्षेत्र हे त्यांच्या संशोधनाचा मुख्य विषय होता. केंद्र सरकारच्या वतीने 2012 मध्ये त्यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
- 'कोरेगाव भीमा'च्या आरोपपत्रातून संभाजी भिडेंचं नाव वगळलं; रिपब्लिकन युवा मोर्चाचा आरोप
प्रा. चित्रे यांचा जन्म 7 मे 1936 मध्ये झाला. मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून त्यांनी गणितात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. ड्यूक ऑफ एडिनबर्ग ही फेलोशिप प्राप्त करत त्यांनी केंब्रिज विद्यापीठात पुढील शिक्षण घेतले. पिटरहाउस स्कॉलर म्हणून त्यांची निवड झाल्यामुळे त्यांनी तिथेच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. केंब्रिज विद्यापीठात उपयोजित गणित आणि सैद्धांतिक भौतिकशास्त्रात त्यांनी 1963 मध्ये पीएच.डी. पूर्ण केली. काही काळ त्यांनी इंग्लंडमधील लीड्स विद्यापीठात अध्यापनाचे काम केले.
पुढे मायदेशी परतत 1967 मध्ये त्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेत अध्यापनाचे आणि संशोधनाचे कार्य केले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'इंटलिजन्स ऍन्ड नॅशनल सिक्युरिटी अलायन्सेस' (आयएनएसए) या संस्थेने त्यांचा मानद वैज्ञानिक म्हणून सन्मान केला होता. होमी भाभा फेलोशिप काउंसिलचे ते कार्यकारी संचालक होते.
- 'मूर्ती लहान, कीर्ती महान' व्यक्तिमत्व; जाणून घ्या लाल बहादूर शास्त्रींबद्दलच्या १० गोष्टी
प्रा. चित्रे यांचे संशोधन :
- सूर्याचे प्रभामंडळ आणि त्याच्याशी निगडित चुंबकीय क्षेत्राचे भौतिकशास्त्र
- सौर चक्रांविषयी महत्त्वपूर्ण संशोधनात त्यांचा मोलाचा वाटा
- सोलर डायनामो थेअरीसंदर्भातील संशोधन
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)