पुणे : ट्रक-दुचाकी अपघातात ज्येष्ठाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

दुचाकीवरून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकास भरधाव ट्रकने पाठीमागून धडक दिली. त्यामध्ये डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

पुणे : दुचाकीवरून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकास भरधाव ट्रकने पाठीमागून धडक दिली. त्यामध्ये डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना फुरसुंगी तरवडे रस्त्यावर घडली.

लक्ष्मण दामोदर पवार (वय ६३, रा. हरपळे आळी, फुरसुंगी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मयुर पवार (वय ३७) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी ट्रकचालकाविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मयुर पवार यांचे वडील दुचाकीवरून फुरसुगी तरवडे रोडने लोणी काळभोर येथील एका शाळेत जात होते. ते सोनार पूलाजवळ आले, त्यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीस जोरात धडक दिली. त्यामध्ये लक्ष्मण पवार हे खाली पडले. त्यांनी हेल्मेट घातले नसल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Senior Citizen Died after Accident in Pune