धक्कादायक, कोरोनावर मात केल्याच्या चौथ्या दिवशी ज्येष्ठाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dead_body

पुरंदर तालुक्यातील जेऊर येथील ६४ वर्षीय जेष्ठ नागरिकाचा कोरोनामुळे काल रात्री उशीरा मृत्यू झाला. या रूग्णाला चार दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले होते. मात्र,

धक्कादायक, कोरोनावर मात केल्याच्या चौथ्या दिवशी ज्येष्ठाचा मृत्यू

वाल्हे (पुणे) : पुरंदर तालुक्यातील जेऊर येथील ६४ वर्षीय जेष्ठ नागरिकाचा कोरोनामुळे काल रात्री उशीरा मृत्यू झाला. या रूग्णाला चार दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले होते. मात्र, पुन्हा त्रास सुरू झाल्य़ाने त्यांना अगोदर जेजुरी कोविड केअर सेंटरमध्ये व तेथून सासवड येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान काल रात्री त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली.

आता एलपीजी सिलिंडर बुकिंग व्हाॅट्सअपवर
    
या ज्येष्ठ व्यक्तील 3० जुलै रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांना जेजुरी येथील कोवीड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथील उपचारानंतर ५ ऑगस्ट रोजी त्यांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले होते. मात्र, घरी गेल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे रूग्वाहिकेच्या मदतीने त्यांना एकदा जेजुरी येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, त्या ठिकाणी पुरेशी सुविधा (व्हेंटिलेटर) उपलब्ध नसल्यामुळे त्यांना सासवड येथील एका खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र, काल सायंकाळी कोरोनाविरूद्धची त्यांची लढाई अखेर संपुष्ठात आली.

पोलिस बनून हाॅटेलमध्ये शिरले, जेवले अन्...
    
जेऊर येथील या पहिल्या रूग्णास प्रथम लागण झाल्यानंतर त्यांच्या जवळच्या संपर्कातील दहा लोकांचे स्वॅब त्यावेळी तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यामधील त्यांचे सर्व अहवाल निगेटिव्ह आले होते. मात्र, उपचार पूर्ण करुन घरी आलेल्या या रूग्णास पुन्हा त्रास झाल्याने उपचारादरम्यान मृत पावल्यानंतर त्यांचा अंत्यविधी देखील जेऊर गावात केल्याने प्रशासनाची चिंता वाढली. आता पुन्हा एकदा ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना संबिधित रूग्णाच्या संपर्कातील नातेवाईक आणि अंत्यविधीला उपस्थित राहिलेल्यांची तपासणी करावी लागणार असल्याची माहिती वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वै्यकिय अधिकारी डॉ. प्रशांत आंधळे व पर्यवेक्षक राजेंद्र दळवी यांनी दिली. या घटनेनंतर गावात सर्वत्र निर्जुंतीकरण येणार असून, गावात प्रतिंबधित क्षेत्र घोषीत करण्यात आले आहे. आरोग्य कर्मचारी आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तपासणी सुरू केल्याचे सरपंच प्रतिक धुमाळ यांनी सांगितले.