काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब खिलारी यांचे निधन

दत्ता म्हसकर
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व पुणे जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब रखमाजी खिलारी वय 75 यांचे आज सोमवार ता. 27 ला दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले.

जुन्नर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व पुणे जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब रखमाजी खिलारी वय 75 यांचे आज सोमवार ता. 27 ला दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले.

त्यांचेवर मंगळवार ता. 28 ला सकाळी 10 वाजता भास्कर घाट, जुन्नर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

पश्चिम आदिवासी भागातील शिंदे ता. जुन्नर हे त्यांचे मूळ गाव होते. 1967 मध्ये ते शिंदे गावचे युवा सरपंच झाले तर 1972 जिल्हा परिषद सदस्य झाले होते.‎ 1974 ते 84 पर्यंत दहा वर्षे मीना खोरे आपटाळे दूध संस्थेचे ते कार्यकारिणी सदस्य होते. 1984 ते 89 पाच वर्षे जुन्नर तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक, 1979 ते 84 संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून काम पाहिले. 1987 ते 2009 पुणे जिल्हा दूध उत्पादक संघांचे संचालक असताना 2004 मध्ये ते संघाचे अध्यक्ष झाले होते. 

शिंदे येथील शंभो दूध उत्पादक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भूविकास बँकेचे संचालक म्हणून काम पाहिले. 1976 पासून येथील श्री शिवाजी मराठा शिक्षण संस्था शिवनेर जुन्नरचे ते संचालक होते. तर 2002 पासून आजपर्यंत ते अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. मराठा ज्ञाती विद्या विकास निधी संस्थेचे ते विद्यमान संस्थापक कार्याध्यक्ष होते.
 

Web Title: Senior Congress leader Balasaheb Khilari passed away