FTII च्या अध्यक्षपदी ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 September 2020

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने यासंदर्भातली घोषणा मंगळवारी केली आहे. शेखर कपूर यांचा कालावधी ३ मार्च २०२३ पर्यंत असणार आहे. या आधी डिसेंबर २०१८ मध्ये बी. पी. सिंग यांची संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. आता मात्र अध्यक्ष म्हणून संवेदनशील दिग्दर्शक शेखर कपूर हे संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.

पुणे - भारतीय चित्रपट आणि दुरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी आणि संस्थेच्या  गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन म्हणून ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांची निवड झाली आहे.

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने यासंदर्भातली घोषणा मंगळवारी केली आहे. शेखर कपूर यांचा कालावधी ३ मार्च २०२३ पर्यंत असणार आहे. या आधी डिसेंबर २०१८ मध्ये बी.पी. सिंग यांची संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. आता मात्र अध्यक्ष म्हणून संवेदनशील दिग्दर्शक शेखर कपूर हे संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.

सिंहगड कोविड केअर सेंटरमध्ये 'ती' गेल्या सहा महिन्यांपासून लावतेय जिवाची बाजी

कपूर यांनी १९७५ मध्ये 'जान हाजिर है' या चित्रपटात अभिनयाच्या निमित्ताने चित्रपटाच्या क्षेत्रात पाउल ठेवले. त्यानंतर १९८३ मध्ये त्यांनी 'मासूम' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आणि त्यांची दिग्दर्शक म्हणून कारकीर्द सुरू झाली. त्यांनी चित्रपट निर्मितीत देखील आपला ठसा उमटविला आहे. आता त्यांच्याजवळील अनुभवांच्या शिदोरीचा लाभ संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना होऊ शकणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Senior director Shekhar Kapoor is the chairman of FTII