ज्येष्ठांनी प्रलंबित मागण्यांसाठी जुन्नरला भर उन्हात काढला मोर्चा

दत्ता म्हसकर
बुधवार, 2 मे 2018

राज्य सरकारकडे प्रलंबित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यासाठी आज भर उन्हात जुन्नर तालुका ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांनी मोर्चा काढून तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले. सरकारने 1999 मध्ये ज्येष्ठ नागरिकासाठी राष्ट्रीय धोरण पारित केले. 

जुन्नर : राज्य सरकारकडे प्रलंबित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यासाठी आज भर उन्हात जुन्नर तालुका ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांनी मोर्चा काढून तहसीलदार व पोलिस निरीक्षकांना निवेदन दिले. सरकारने 1999 मध्ये ज्येष्ठ नागरिकासाठी राष्ट्रीय धोरण पारित केले. 

2004 मध्ये अखर्चिक व 2013 ला खर्चिक बाबीवरील धोरण जाहीर केले. पण अंदाजपत्रकात तरतुदी केल्या नाहीत. गेल्या दहा वर्षांपासून संघटना यासाठी आंदोलन करीत आहे. सातत्याने पाठपुरावा करून देखील एकही मागणी मंजूर खेळू नाही यासाठी फेस्कॉमने शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून प्रलंबित मागण्यासाठी आंदोलन करण्याची सूचना केली होती. त्यानुसार आज जुन्नरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून मोर्चास सुरवात झाली.

तहसील कार्यालयाच्या आवारात सभा झाली. यावेळी एस. एन. भालवणकर, जे.एल.वाबळे,उत्तम वाकचौरे, गेंगजे यांनी मोर्चास संबोधित केले. यानंतर तहसीलदार व पोलिस निरीक्षक  यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. रामचंद्र नजान यांनी आभार मानले.
 

Web Title: Senior men clash Junnar for pending demands