विमानतळजवळील शाळेत बॉम्बसदृश्‍य वस्तु आढळल्यामुळे खळबळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मे 2019

पुणे : विमानतळ परिसरातील एअर फोर्स स्कूल या शाळेच्या परिसरामध्ये मंगळवारी सकाळी बॉम्बसदृश्‍य वस्तु आढळल्यामुळे खळबळ उडाली. दरम्यान, बॉम्बशोधक व नाशक पथक (बीडीडीएस) घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपासणी केल्यानंतर दिवाळी सणाच्यावेळी उडविण्यात येणारा पाऊस प्रकारातील फटाका असल्याचे निदर्शनास आले. 

विमानतळ परिसरामध्ये एअर फोर्स स्कूल ही शाळा आहे. मंगळवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास शाळेच्या मैदानामध्ये एका व्यक्तीस बॉम्बसदृश्‍य संशयास्पद वस्तु निदर्शनास आली. त्यानंतर संबंधीत व्यक्तीने पोलिस नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली. नियंत्रण कक्षाने विमानतळ पोलिसांना तत्काळ माहिती देऊन ठाण्याशी तत्काळ संपर्क केला. दरम्यान काही वेळातच बीडीडीएस पथक घटनास्थळी दाखल झाले. विमानतळ पोलिसांनी परिसरामध्ये नागरिकांना येण्यास थांबविले. त्यानंतर बीडीडीएसच्या पथकाने बॉम्बसदृश्‍य वस्तुची पाहणी करुन ती वस्तु नष्ट केली. 

याबाबत विमानतळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील म्हणाले, "एअर फोर्स स्कूलच्या आवारात बॉम्बसदृश्‍य वस्तु असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस तत्काळ घटनास्थळी पोचले. बीडीडीएस पथकाने त्याची पाहणी करुन ती वस्तु नष्ट केली. दिवाळी सणाला उडविण्यात येणाऱ्या पाऊस प्रकारातील ती वस्तु होती. शाळेच्या जवळच एक वस्ती आहे. संबंधीत वस्तीमधील मुलांनी खेळताना ती वस्तु टाकली असण्याची शक्‍यता आहे.'' 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensation due to rumour of bomb in school near airport in pune