कात्रज चौक ते नवले उड्डाणपुलापर्यंत होणार स्वतंत्र महामार्ग - तापकीर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

कात्रज चौक ते नवले उड्डाणपुलापर्यंत स्वतंत्र महामार्ग तयार करण्यात येणार असल्याचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी सांगितले. आमदार तापकीर यांच्याकडून कात्रज चौक ते वडगाव पुलापर्यंत रस्त्यांच्या कामांची पाहणी करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. नवले पूल ते कात्रज रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाचा वेग कमी आहे. कामाची परिस्थिती पाहता मे 2021अखेर काम पूर्ण होणार नाही.

कात्रज (पुणे) - कात्रज चौक ते नवले उड्डाणपुलापर्यंत स्वतंत्र महामार्ग तयार करण्यात येणार असल्याचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी सांगितले. आमदार तापकीर यांच्याकडून कात्रज चौक ते वडगाव पुलापर्यंत रस्त्यांच्या कामांची पाहणी करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. नवले पूल ते कात्रज रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाचा वेग कमी आहे. कामाची परिस्थिती पाहता मे 2021अखेर काम पूर्ण होणार नाही. काम पूर्ण करायचे असेल तर कामाचा वेग वाढविला पाहिजे. अशा सूचना आमदार तापकीर यांनी राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांना केल्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांकडून काम मे 2021अखेर पूर्ण होईल असे सांगितले जात आहे. परंतु, 15 नोव्हेंबर 2019 रोजी भूमिपूजन झाले होते. प्रत्यक्षात मागील वर्षभरात 10 टक्के पेक्षा कमी काम झाले आहे. अनलॉक नंतर रस्त्याच्या कामाचा वेग दिसत नाही. काम करणारी रस्त्यावर यंत्रसामुग्री नाही. कामगार दिसत नाहीत. मग काम कसे पूर्ण करणार? असा प्रश्न आमदार तापकीर यांनी अधिकाऱ्यांना केला. 

गौतम पाषाणकर प्रकरणाला वेगळे वळण; बेपत्ता होण्यामागे बड्या राजकीय व्यक्तीचा हात?

कात्रज देहूरोड बाह्यवळण रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामांची होणाऱ्या अपघातांच्या पार्श्‍वभूमीवर रस्त्याच्या कामांना गती देण्याकरिता राष्ट्रीय महामार्ग विभाग पुणे यांचे पदाधिकारी व खडकवासला विधानसभा मतदारसंघांचे आमदार भीमराव तापकीर यांच्यासह एकत्रित पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय महामार्ग पुणे विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग पुणे विभागाच्या उप-अभियंता श्रुती नाईक यांनी माहिती दिली.

कोरोना काळात १० लाख कुटुंबांना केली मदत - राष्ट्रीय स्वंयसेवक संघ

कोरोना काळामध्ये रखडलेले काम आता लवकरात लवकर ठेकेदारांमार्फत पूर्ण करण्यात येणार आहे. तेव्हा हा रस्ता झाल्यानंतर नागरिकांच्या सोयीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या पाहणी दौऱ्यात मा. नगरसेवक शंकर बेलदरे पाटील, आंबेगाव येथील मा. उपसरपंच दिनेश कोंढरे, मा. उपसरपंच संतोष ताठे, सचिन चव्हाण, अरुण राजवाडे, सचिन बदक, कुणाल बेलदरे हे उपस्थित होते.

पाच किलोमीटर मार्गावर सुरु असलेले रुंदीकरणाचे काम व नियोजित असलेल्या दोन भुयारी मार्गाच्या अनुषंगाने कामास गती देण्यात येईल. याबाबत काही अडचणी असल्यास त्या लवकरच सोडवून हा रस्ता वाढवण्यात येणार आहे.
- धनंजय देशपांडे, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग पुणे विभाग.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: separate highway from Katraj Chowk to Navale flyover bhimrao tapkir