सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी केले एक वर्ष स्थानबद्ध

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

पुणे : विविध प्रकारचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर खडक पोलिसांनी महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (एमपीडीए) कारवाई केली. त्यामुळे संबंधीत गुन्हेगाराला एक वर्ष कारागृहामध्ये स्थानबद्ध करण्यात येणार आहे. पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी पदभार घेतल्यानंतर पहिल्यांदा "एमपीडीए' अंतर्गत कारवाई झाली आहे. 

आरबाज उर्फ बबन इक्‍बाल शेख (वय 24, रा. चुडामण तालीम, भवानी पेठ) असे "एमपीडीए' अंतर्गत कारवाई केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरबाज विरुद्ध खडक पोलिस ठाण्यात मारामारी, घातक शस्त्र बाळगणे, लहान मुलीचा विनयभंग, जमाव जमवून घरात घुसून मारहाण करणे, धमकी, खंडणी यांसारखे गुन्हे आहेत. त्याच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी 2017 मध्ये त्यास 2 वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र, त्याने संबंधीत आदेशाचे उल्लंघन केले. तसेच, त्याच्या दहशतीमुळे सामान्य नागरीक तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हते. या पार्श्‍वभुमीवर खडक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी याने आरबाजवर "एमपीडीए' अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलिस आयुक्तांकडे पाठविला होता. त्यास डॉ. व्यंकटेशम यांनी मान्यता दिली. त्यानंतर 3 डिसेंबरपासून संबंधीत गुन्हेगारास एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.

Web Title: Serial offenders detained for one year by the police