पुणे : 'व्हॉल्वो मॅगीरस'ने दिली सीरमची आग विझविण्यास पुणे अग्निशामक दलास साथ

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 January 2021

सीरममध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पुणे अग्निशामक दलाकडून कसोशीने प्रयत्न सुरू असतानाच ऍमनोरा टाऊनशीपची अग्निशामक दलाची "व्होल्वो मॅगीरस' ही अत्याधुनिक अग्निशामक यंत्रणा पुणे अग्निशामक दलाच्या मदतीला धावून गेली.

पुणे - सीरममध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पुणे अग्निशामक दलाकडून कसोशीने प्रयत्न सुरू असतानाच ऍमनोरा टाऊनशीपची अग्निशामक दलाची "व्होल्वो मॅगीरस' ही अत्याधुनिक अग्निशामक यंत्रणा पुणे अग्निशामक दलाच्या मदतीला धावून गेली. तब्बल 25 मजल्यांपर्यंत पोचून आग विझविण्याची क्षमता असणाऱ्या या "व्हॉल्वो मॅगीरस' यंत्राचा पहिल्यांदा आग विझविण्यासाठी वापर झाला. 

Serum Institute Fire: मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत; सायरस पुनावालांनी केली घोषणा

सीटी कॉर्पोरेशन लिमीटेडचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांचा ऍमनोरा टाऊनशीपचे उपाध्यक्ष सुनील तरटे यांना 2.50 वाजता फोन आला. सीरममध्ये लागलेल्या आगीसाठी ऍमनोराकडे असलेल्या "व्होल्वो मॅगीरस' या अग्निशाकम वाहन व संबंधीत कर्मचाऱ्यांना तत्काळ सीरममध्ये पाठविण्याबाबत त्यांनी तरटे यांना सांगितले. त्यानंतर काही वेळातच तरटे यांनी ऍमनोरा टाऊनशीपच्या अग्निशामक दलाचे प्रमुख जॉबी अब्राहम यांना माहिती दिली. त्यांनीही आपल्या टिमला घेऊन तत्काळ सीरममध्ये धाव घेतली. त्यानंतर पुणे अग्निशामक दल, पीएमआरडीए अग्निशामक दलाच्या मदतीने अब्राहम व त्यांच्या टिमने आग विझविण्यास सुरूवात केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

ऍमनोरा टाऊनशीपमध्ये "व्होल्वो मॅगीरस' हे अत्याधुनिक अग्निशामक वाहन आठ वर्षांपुर्वी दाखल झाले होते.त्याचा सीरममध्ये पहिल्यांदाच वापर करण्यात आला. 55 मीटर उंच म्हणजेच तब्बल 25 व्या मजल्यापर्यंत आग विझविण्याची या यंत्राची क्षमता आहे. ते या यंत्रावरील बकेटमध्ये चौघेजण बसून 25 व्या मजल्यावरील आग विझविण्याबरोबरच तेथे अडकलेल्या माणसांचे प्राण वाचविण्याचेही काम करते, असे तरटे यांनी सांगितले.

सीरम आग प्रकरणाचा क्राईम ब्राँचसुद्धा तपास करणार : पोलिस आयुक्त

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Serum Institute Fire Brigade MSEZ Building volvo magiras Help