सीरम आग प्रकरणाचा क्राईम ब्राँचसुद्धा तपास करणार : पोलिस आयुक्त

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 January 2021

आगीची घटना मोठी आहे. त्यातही पाच जणांचा झालेला मृत्यू ही गंभीर बाब आहे. घटना घडलेले ठिकाण हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते. त्यामुळे त्यांच्याकडून या घटनेचा कार्यलययीन तपास केला जाईल. ​

पुणे : सीरम इन्स्टिट्यूटच्या मांजरी येथील प्रकल्पातील आगीची घटना मोठी आणि गंभीर आहे. हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडल्याने हडपसर पोलिस त्याचा कार्यालयीन तपास करतील. त्याचबरोबर गुन्हे शाखेकडूनही या घटनेचा समांतर तपास केला जाईल, असे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुरुवारी (ता.२१) स्पष्ट केले. 

सीरम इन्स्टिट्यूटच्या मांजरी येथील प्रकल्पास आग लागल्याच्या घटना पोलिस आयुक्त गुप्ता यांना सव्वा तीन वाजता समजली. त्यानंतर पावणे चार वाजता आयुक्त गुप्ता हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून सीरम इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ पोलिस अधिकारी व अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधत आगीची माहिती घेतली. 

Serun Institute Fire: सीरमच्या आगीतील मृतांची ओळख पटली; दोघे पुण्याचे​

गुप्ता म्हणाले, "सीरम इन्स्टिट्यूटच्या मांजरी प्लांटमध्ये एक इमारत आहे. संबंधित इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एक लॅब आहे, तेथे कोविशील्ड लसीची निर्मिती होत नाही, त्याचबरोबर अन्य कोणत्याही प्रकारचे उत्पादन होत नाही. सध्या तेथे इलेक्‍ट्रिकल व फर्निचरचे काम सुरू होते. त्यामुळे इलेक्‍ट्रिकचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे कर्मचारी तेथे उपस्थित होते. त्या चार ते पाच जणांना अग्निशामक दलाने बाहेर काढले. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. त्यानंतर आग लागलेल्या ठिकाणी पाण्याचा मारा करताना अग्निशामक दलाच्या जवानांना पाच जणांचे मृतदेह आढळून आले.'' 

'हम तेजस्वी यादव बोल रहे हैं, DM साहब'; व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल​

आगीची घटना मोठी आहे. त्यातही पाच जणांचा झालेला मृत्यू ही गंभीर बाब आहे. घटना घडलेले ठिकाण हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते. त्यामुळे त्यांच्याकडून या घटनेचा कार्यलययीन तपास केला जाईल. त्याचबरोबर आगीच्या या घटनेचा समांतर तपास गुन्हे शाखेकडूनही केला जाईल. त्यामध्ये आगीच्या घटनेच्या मुळापर्यंत जाणे शक्‍य होईल, असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Serum Institute fire incident will be investigated parallel by Crime Branch says Police Commissioner Amitabh Gupta