esakal | 'हम तेजस्वी यादव बोल रहे हैं, DM साहब'; व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

Tejashwi_Yadav

शिक्षक उमेदवार पाटण्यातील इको पार्क येथे आंदोलन करत होते. तेजस्वी यादव तेथे पोहोचताच आंदोलकांमध्ये खळबळ उडाली. काहींनी तेजस्वी यादव जिंदाबादच्या घोषणा दिल्या.

'हम तेजस्वी यादव बोल रहे हैं, DM साहब'; व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पटना : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव बुधवारी (ता.२०) टीईटी परीक्षा पास झालेल्या शिक्षक उमेदवारांच्या तारणहारच्या भूमिकेत दिसून आले. त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. 

पाटणा येथे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी शिक्षकांना पाठिंबा देण्यासाठी यादव तेथे गेले होते. आंदोलन करण्यासाठी जागा मिळत नसल्याची तक्रार त्यांनी यादव यांच्याकडे केली. त्यावेळी तेजस्वी यादव यांनी आंदोलनस्थळावरून अधिकाऱ्यांना फोन लावला. 

'ठोको ताली'; बायडेन यांच्या भाषणामागे भारतीयाचा हात!

शिक्षक उमेदवार पाटण्यातील इको पार्क येथे आंदोलन करत होते. तेजस्वी यादव तेथे पोहोचताच आंदोलकांमध्ये खळबळ उडाली. काहींनी तेजस्वी यादव जिंदाबादच्या घोषणा दिल्या. पहिल्यांदा यादव यांनी आंदोलकांशी चर्चा केली आणि त्यानंतर त्यांनी मुख्य सचिव, डीजीपी आणि पाटण्याच्या डीएम यांना फोन केला. यावेळी डीएमशी बोलतानाचा यादव यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

काँग्रेस शोधतेय राहुल गांधींना पर्याय; अध्यक्षपदाच्या शर्यतीत ज्येष्ठ नेता​

शिक्षकांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला तसेच त्यांचं अन्न फेकून दिलं. सर्व आंदोलक घाबरलेले आहेत. आंदोलकांचं निवेदन मी तुम्हाला व्हॉट्सअॅप करतो. तुम्ही त्यांना आंदोलन करण्याची परवानगी द्या. कधीपर्यंत काम होणार असं तेजस्वी यादव यांनी विचारलं. त्यावर डीएम म्हणाले, तुम्ही मला प्रश्न विचारणार का? तेव्हा 'हम तेजस्वी यादव बोल रहे हैं, डीएम साहब' असं यादव म्हणाले. कदाचित डीएम साहेबांनी मला फोनवर ओळखलं नाही, हे यादव यांनी बोलून दाखवलं. तेजस्वी यादव फोनवर बोलत आहेत, हे समजताच डीएम साहेब यांच्या बोलण्यात बदल झाला. आणि लगेच काम करण्याचं मान्य केलं. यादव आणि डीएम यांच्यामधील हा फोन कॉल आता बिहारच नव्हे तर भारतभर व्हायरल झालेला आहे. 

मोदी सरकारची मोठी घोषणा; १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत प्रत्येकाला मिळणार घर!​

नियुक्ती पत्र देण्याची मागणी करत टीईटी उमेदवारांनी हे आंदोलन पुकारलं. त्याची दखल तेजस्वी यादव यांनी घेतली. यावेळी यादव यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर निशाणा साधला आणि विधानसभेत हे प्रकरण उचलून धरणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

(Edited by: Ashish N. Kadam)