कोविड व्हॅक्सिनची लस परवडणाऱ्या दरात; सीरमला सरकारकडून ऑर्डरही मिळाली!

योगीराज प्रभुणे
Monday, 11 January 2021

कोरोना प्रतिबंधक लस खरेदीची पहिली ऑर्डर "सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'कडे (एसआयआय)केंद्र सरकारने नोंदविली.

पुणे - कोरोना प्रतिबंधक लस खरेदीची पहिली ऑर्डर "सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'कडे (एसआयआय)केंद्र सरकारने नोंदविली. 11 कोटी डोस खरेदी करण्याची ही पहिली ऑर्डर असून, आज रात्री किंवा मंगळवारी सकाळीपर्यंत या लसी देशातील वेगवेगळ्या केंद्रामध्ये पुण्यातून रवाना केल्या जातील. या एका लसीच्या डोसची किंमत 200 रुपये निश्‍चित झाली आहे. 

"ऑक्‍सफर्ड युनिव्हर्सिटी' आणि "ऍस्टाझेनेका' यांनी विकसित केलेल्या आणि पुण्यातील "एसआयआय'मध्ये विकसित झालेल्या "कोव्हिशिल्ड' लसीच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्र सरकारच्या "सेंट्रल ड्रग्ज स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायजेशन"ने (सीडीएससीओ) 1 जानेवारीला परवागनी दिली. त्यानंतर बरोबर दहा दिवसांनी कोव्हिशिल्ड लसीच्या खरेदी पहिली खरेदी ऑर्डर "एसआयआय'ला मिळाली. केंद्राने 22 कोटी डोस खरेदी करण्याबद्दल चर्चा झाली होती. प्रत्यक्षात 11 कोटी लसीचे डोस खरेदी करण्याचा येत असल्याची माहिती "एसआयआय'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

ककोरोना विषाणूंच्या संसर्गाला प्रतिबंधित करणारी कोव्हॅक्‍सिनचे पुण्यात उत्पादित करण्यात आली आहे. त्यामुळे देशातून सर्व शहरांना ही लस पुण्यातून वितरित केली जाईल. त्यासाठी पूर्व, पश्‍चिम, दक्षिण आणि उत्तर या दिशांप्रमाणे वर्गवारी केली आहे. या लस वितरणाच्या मुख्य केंद्रावर पुण्यातून लस वितरित होणार आहे. त्यासाठी 12 ते 10 कोल्ड स्टोअरेज ट्रक सज्ज ठेवले आहेत. केंद्राचा आदेश मिळताच हे ट्रक आकुर्डीवरून हडपसर येथील सिरम इन्स्टिट्युटमध्ये जातील. तेथे ट्रकमध्ये लशीचे डोस अपोलड होतील. त्यानंतर ते विमानतळावर जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

हे वाचा - Corona Update : रुग्णवाढीचा दर 20 हजारांच्याही खाली; PM मोदींची राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक

"सेंट्रल ड्रग्ज स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायजेशन"ने (सीडीएससीओ) आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्‍सिन या दोन लसींना आपत्कालीन वितरणासाठी परवानगी दिली. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया व्ही. जी. सोमाणी यांनी दिली. त्यानंतर अकरा दिवसांनी आता लस वितरण होत आहे. या दरम्यान लशीची नेमकी खरेदी किंमत, कोणत्या कंपनीच्या किती लसी सरकार खरेदी करेल, त्याचे वितरण व्यवस्था कशी असेल, त्याचे लसीकरण कसे होईल याची तयारी या अकरा दिवसांमध्ये करण्यात येईल. ही तयारी आणि खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता प्रत्यक्ष लस वितरणाच्या टप्पा सुरू होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: serum-institute-may get-purchase-order-today-vaccine cost-200-per-vial