
पुणे : हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांकडून सेवा शुल्क वसूल करणे बंधनकारक नाही, हे स्पष्ट असूनही शहरातील अनेक ठिकाणी हे शुल्क बेकायदा आकारले जात आहे. ग्राहकांनी नकार दिला तरी ‘हा शुल्क द्यावाच लागेल’,‘ मेन्यू कार्डमध्ये तसे नमूद आहे,’ अशा शब्दांत दबाव आणला जातो. त्यामुळे पुण्यातील ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त ताण पडत आहे.