esakal | बारामतीत एकाच दिवशी सात जणांचा कोरोनाने मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत एकाच दिवशी सात जणांचा कोरोनाने मृत्यू

शहरात आज एकाच दिवशी कोरोनाने सात जणांचा मृत्यू झाला. या पैकी चार जण बारामती तालुक्यातील असून उर्वरित तिघे अनुक्रमे म्हसवड व माण येथील आहेत.

बारामतीत एकाच दिवशी सात जणांचा कोरोनाने मृत्यू

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : शहरात आज एकाच दिवशी कोरोनाने सात जणांचा मृत्यू झाला. या पैकी चार जण बारामती तालुक्यातील असून उर्वरित तिघे अनुक्रमे म्हसवड व माण येथील आहेत.

पत्रकारांच्या विमा संरक्षणाबाबत उपमुख्यमंत्र्यांनी दिले संकेत; अधिवेशनात मांडणार मुद्दा

बारामतीतील रुई ग्रामीण रुग्णालयासह काही खाजगी दवाखान्यात कोरोनावर उपचार सुरु असताना या सात जणांनी शेवटचा श्वास घेतला. या मुळे बारामतीतील कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा आता 49 वर जाऊन पोहोचला आहे.

बारामतीत रुग्णसंख्या जशी झपाट्याने वाढते आहे, त्याच पध्दतीने मृतांचा आकडाही वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण आहे. लक्षणे नसलेल्यांची संख्या अधिक असली तरी मध्यम, सौम्य लक्षणे असणा-यांसह काही जणांची प्रकृती वेगाने गंभीर होत असल्याने काळजी वाढतच आहे. अनेक धडधाकट वाटणा-या रुग्णांची तब्येत वेगाने खालावते व ते मृत्यूच्या दारात जाऊन उभे राहतात, अशा काही घटना घडल्याने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान मध्यम लक्षणे, गंभीर लक्षणे व चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णांवर अधिक लक्ष केंद्रीत करुन त्यांचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात लवकरच अतिदक्षता विभागाचे 20 बेडस तयार होत असून, त्याचाही उपयोग ज्यांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांच्यासाठी केला जाणार आहे. दरम्यान, बारामती नगरपालिकेच्या कर्मचा-यांकडून सातत्याने चोवीस तास मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम अव्याहतपणे सुरु असून  आजही सात मृतदेहांवर त्यांनी न थकता अंत्यसंस्कार केले. 

(Edited by : Sagar Diliprao Shelar)