'सेव्हन मंत्रा'च्या शहाळे पाण्याला भरघोस प्रतिसाद

Seven-Mantra
Seven-Mantra

पुणे - सेव्हन मंत्राने उपलब्ध केलेल्या पॅकिंग स्वरूपात गोठवलेल्या शहाळे पाण्याला ग्राहकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. दर मंगळवारी ही सेवा घरपोच असेल. नैसर्गिक चव असलेले हे पॅकयुक्त शहाळे पाणी कधीही, कोठेही सेवन करता येणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एका शहाळ्यामध्ये १८० ते २३० मि.लि. पाणी असते. हा विचार करूनच २०० मि.लि. पाउच विकसित केला आहे. रोज एक पाउच याप्रमाणे आठवड्याची गरज म्हणून केवळ ३८५ रुपयांमध्ये सात पाउच या स्वरूपात हे शहाळे पाणी उत्पादन उपलब्ध केले आहे. हे पाउच घरातील फ्रिजरमध्ये ठेवता येतात. जेव्हा शहाळे पाणी प्यावयाचे आहे, तेव्हा एक पाउच बाहेर काढून ठेवावा. अर्ध्या तासात पाउचमधील पाणी वितळते. 

गोठवलेल्या शहाळ्यातील पाण्याची वैशिष्ट्ये

  • १०० टक्के नैसर्गिक.
  • प्रिझर्व्हेटिव्ह, साखर किंवा इतर घटकांचा वापर नाही.
  • हातांचा स्पर्श न होता शहाळ्यातून पाणी उणे ४० अंश सेल्सिअस तापमानाला गोठवले जाते.
  • गोठवलेले पाउच घरातील फ्रिजरमध्ये सुमारे तीन महिने टिकते.

नारळ पाणी खूप आवडले. डिफ्रीज केल्यानंतर सुद्धा चव अगदी ताज्या शहाळ्याप्रमाणे नैसर्गिक व मधुर लागली. 
- अश्विनी पोळ.

नारळ पाणी हे खूपच उत्कृष्ट दर्जाचे व नैसर्गिक पद्धतीचे आहे. लहान मुलांना ते खूपच पसंत पडले आहे.
- दत्तात्रेय टिळेकर, दिघी

नारळ पाणीचे पॅकेजिंग सुंदर आहे. इम्युनिटी वाढविण्यासाठी उत्तम आहे. चव ही चांगली आहे.
- युनूस अमिन मुल्ला,  निगडी प्राधिकरण

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com