दर गुरुवारी ‘एक्‍झॉटिक व्हेजिटेबल’; ब्रोकोली, रेड कॅबेज,बेबी कॉर्न आदींचा समावेश 

Exotic Vegetable Basket 
Exotic Vegetable Basket 

पुणे- आरोग्याची काळजी घेतल्यास दवाखान्याच्या फेऱ्या वाचवता येतात, असा सल्ला अनेकदा तज्ज्ञांकडून दिला जातो. त्यासाठी योग्य आहाराचीही शिफारस केली जाते. नेमकी हीच बाब ओळखून सेव्हन मंत्राने ‘एक्‍झॉटिक व्हेजिटेबल्स बास्केट’ (Exotic vegetable basket) सादर केली आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक गुरुवारी ही बास्केट घरपोच केली जाणार आहे. 

विविध आरोग्य समस्यांसाठी पथ्य म्हणून या भाज्या उपयुक्त तर आहेतच शिवाय विविध खाद्यपदार्थांमध्ये सजावटीसाठीही त्या महत्वाची भूमिका बजावतात.

या बास्केटमध्ये मिळणाऱ्या भाज्या व आरोग्यासाठी त्यांची उपयुक्तता खालीलप्रमाणे आहे. 

झुकिनी - कमी उष्मांक (कॅलोरिफिक व्हॅल्यू) असलेली, कोलेस्ट्रॉल आणि चरबीचे प्रमाण कमी करण्यात गुणकारी.

आइसबर्ग लेट्युस - पाण्याचे प्रमाण अधिक. कॅल्शियम, पोटॅशियम, क जीवनसत्व यांचा उत्तम स्रोत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चेरी टोमॅटो - विटामिन ए, सी आणि के यांचा उत्तम स्रोत, तसेच फोलेट, मॅग्नेशियमचेही चांगले  प्रमाण.

इटालियन बेसिल - स्वादवर्धक. कमी उष्मांक. कॅल्शियम, मॅग्नेशियमचा चांगला पुरवठा. 
ब्रोकोली - प्रथिनांचा उत्तम स्रोत. विटामिन सी, के चे चांगले प्रमाण.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com