'सेव्हन मंत्रा' एक्‍झॉटिकच्या आता तीन नव्‍या बास्केट उपलब्ध

Seven-Mantras
Seven-Mantras
Updated on

पुणे - अल्पावधीतच पुणेकरांची विश्वसनीय ऑनलाइन मंडई ठरलेल्या सेव्हन मंत्राने आता एक्झॉटिकच्या तीन नव्‍या बास्केट उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचबरोबर आठवड्यातून चार दिवस वितरण सेवा सुरू केली आहे. त्यामुळे रविवार, मंगळवार आणि गुरुवारसह शनिवारीही पुणेकरांना भाजी खरेदी करणे शक्‍य होणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ग्राहकांच्या मागणीनुसार तीन नव्या एक्‍झॉटिक बास्केट सादर केल्या आहेत. प्रामुख्याने पुणे शहरालगतच्या प्रदेशातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या एक्‍झॉटिक भाजीप्रकारांचा समावेश या बास्केटमध्ये करण्यात आला आहे. आधुनिक, युवा आणि खवय्येगिरी करणाऱ्या नागरिकांची गरज लक्षात घेऊन, या एक्‍झॉटिक व्हेज बास्केट विविध कौटुंबिक आकार, ग्राहकांची पसंती लक्षात घेऊन या तीन नव्या बास्केट सादर करण्यात आल्या आहेत.

ग्रॅंड एक्‍झॉटिक बास्केट
एकूण २५ एक्‍झॉटिक भाजीप्रकारांचा समावेश असलेली ही बास्केट वैविध्याने नटलेली आहे. यामध्ये रोझमेरी, थाईम, ओरेगानो असे हर्ब; थाई मिक्‍समध्ये थाई वांगे, थाई बर्ड चिली, थाई स्वीट बेसिल, गलान्गल आणि काफिर लाइम लिव्ज; बेबी स्पिनॅच, लेट्युस, अवोकॅडो, आइसबर्ग, ब्रोकोली, मशरूम, झुकिनी, रेड कॅबेज, चेरी टोमॅटो, इटालियन बेसिल, सेलेरी, लिक यांचा समावेश आहे.

एक्‍झॉटिक कॉन्टिनेन्टल बास्केट
घरातच राहून बच्चेकंपनी कंटाळून गेल्याचा घरोघरी अनुभव आहे. पिझ्झा, बर्गर, पास्ता कधी खायचा अशा बालहट्टाने सगळे घर डोक्‍यावर घेतले जात आहे. तर मुलांना घेऊन सध्याच्या स्थितीत बाहेर जाऊन हॉटेलिंग करणेही धोक्‍याचे आहे. त्यामुळे घरातच आपल्या आवडीचे पदार्थ करून खाणे योग्य ठरणार आहे. यासाठी पर्याय म्हणून घरीच पिझ्झा, बर्गर, पास्ता बनवण्यासाठी उपयुक्त ९ एक्‍झॉटिक भाजीप्रकारांचा समावेश असलेली ही बास्केट सादर करण्यात आली आहे.

थाई व्हेज बास्केट
थाई करीचा आस्वाद घेण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांची मागणी लक्षात घेत १० भाजीप्रकार असलेली थाई व्हेज बास्केट सादर करण्यात आली आहे. यामध्ये पूर्व आशिया प्रदेशातील लोकप्रिय असलेले भाजीप्रकार म्हणजेच चायनीज कॅबेज, पॅकचॉय, लेमनग्रास, लोटस स्टेम, थाई जिन्जर, थाई ब्रिन्जल, थाई स्वीट बेसिल यांचा समावेश आहे.

एक्‍झॉटिक, शहाळेही आठवड्यातून दोन दिवस
ग्राहकाचा तृप्त ढेकर हीच खरी पावती मानत ग्राहक मागणीनुसार, आता एक्‍झॉटिक बास्केट आणि शहाळे पाणी आठवड्यातून दोन दिवस वितरित केले जाणार आहे. आजवर केवळ गुरुवारी वितरित केली जाणारी एक्‍झॉटिक बास्केट रविवारीही मिळणार आहे. नैसर्गिक चव असलेल्या नारळपाणी पाऊचना चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याने गुरुवार आणि रविवार असे दोन दिवस नारळपाणी पाऊचचे वितरण केले जाणार आहे. शहाळे पाण्याला आता रुग्णालयातूनही मागणी वाढली आहे. तेव्हा घरीच राहून www.sevenmantras.com वेबसाइटवर किंवा Sevenmantras या एंड्रॉईड ॲपवरून आपली आवडती भाजी, फळे व इतर उत्पादने खरेदी करत कुटुंबाची आरोग्यसुरक्षा साधा.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com